छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar RTO) आरटीओ विभागाला हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. वैजापूरच्या हद्दीत नियमबाह्य वाहन तपासणी आणि दंडात्मक कारवाईवरून आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर जोरदार (Chhatrapati Sambhajinagar RTO) खडाजंगी झाल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून बाहेरचं भरारी पथक वैजापूरच्या हद्दीत बोगस वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक अधिकाऱ्याने केला आहे. या ऑडिओ क्लिपने आरटीओ विभागातील अंतर्गत वाद आणि हद्दीच्या नावाखाली चालणाऱ्या वसुलीचा खेळ चव्हाट्यावर आणला आहे. यातील मोरे नावाच्या अधिकाऱ्याने छत्रपती संभाजी नगरच्या आरटीओ अधिकाऱ्याकडे संबंधित प्रकरणाची तक्रार केली आहे. या ऑडिओ क्लिपमधील संवादाची एबीपी माझा पुष्टी करत नाही.(Chhatrapati Sambhajinagar RTO)
Chhatrapati Sambhajinagar : चर्चेत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील संवाद
*एक व्यक्ती:* साईड जोडला नाही साहेब, ते गाडी चालू आहे, चालू मध्ये हे झालं...*स्थानिक अधिकारी:* वैजापूरच्या हद्दीत येऊ नका इकडे!*एक व्यक्ती:* हो सर, हो सर.*स्थानिक अधिकारी:* वैजापूरच्या हद्दीतल्या गाड्या पकडण्याचा अधिकार नाही तुम्हाला, ते स्क्वाड औरंगाबादसाठी आलेले आहे. कोण आहे त्या स्क्वाडमध्ये?*एक व्यक्ती:* मोरे साहेब आहेत सर.*स्थानिक अधिकारी:* कोणत्या गाडीला मेमो दिला तुम्ही?*एक व्यक्ती:* हे हायवा होता सर, ९२-९२.*स्थानिक अधिकारी:* हा, मग त्या वैजापूरच्या हद्दीतल्या गाडीला कशामुळे दंड देताय तुम्ही?*एक व्यक्ती:* मला काय माहीत सर!*स्थानिक अधिकारी:* माहीत नाही का वैजापूरची हद्द कोणती आहे तर?*एक व्यक्ती:* नाही ना सर, इकडे आम्ही कन्नडकडे जात होतो...*स्थानिक अधिकारी:* ते साहेबांकडे फोन दे.(गाडीवाला फोन मोरे साहेबांकडे देतो)*योगेश मोरे (RTO इन्स्पेक्टर):* हॅलो...*स्थानिक अधिकारी:* साहेब, त्या वैजापूरच्या गाड्यांना दंड देऊ नका ना तुम्ही वैजापूरच्या हद्दीतल्या!*योगेश मोरे:* साहेब, आमचा बाहेरचा स्क्वाड आहे, तुम्हाला तर माहितीये.*स्थानिक अधिकारी:* बाहेरचा स्क्वाड आहे तुम्ही, जरी बाहेरचा स्क्वाड असेल तुमचा आदेश औरंगाबादसाठी आहे, वैजापूरसाठी नाहीये. मला सगळं माहीत आहे बाहेरचा स्क्वाड. जनीश इयुने बोलतोय मी...*योगेश मोरे:* रस्त्यावर... नाही साहेब हे... काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाहीये!*स्थानिक अधिकारी:* तसं नाहीये, तुम्ही... तुम्ही वैजापूरच्या हद्दीमधल्या गाड्यांना दंड देऊ नका ना!*योगेश मोरे:* वैजापूरची हद्द आणि औरंगाबादची हद्द ही काय रिमार्केबल नाही केलेली साहेब आमच्यासाठी.*स्थानिक अधिकारी:* तुमच्या... मग तुम्ही माहिती घ्या ना साहेब!*योगेश मोरे:* माहिती घ्या, मी...*स्थानिक अधिकारी:* तुम्हाला माहीत आहे का इथं काय चाललंय? तुम्हाला माहीत आहे का?*योगेश मोरे:* मला काही माहीत नाही सर, आणि माहीत करून घेण्यासाठी तुमच्या दोघांचं त्या पद्धतीने को-ऑर्डिनेशन पाहिजे ना!*स्थानिक अधिकारी:* तुम... तुमचं काय नाव आहे साहेब?*योगेश मोरे:* मैं योगेश मोरे बोलतोय, आरटीओ इन्स्पेक्टर.*स्थानिक अधिकारी:* कुठून आलेला आहात तुम्ही?*योगेश मोरे:* मी श्रीरामपूरवरून आलोय.*स्थानिक अधिकारी:* हा, मग तुम्हाला को-ऑर्डिनेशन माहीत नाही, तर तुम्हाला समोरचा सांगतोय, तुम्ही फोन घ्या ना त्यांचे!*योगेश मोरे:* पहिल्यांदा माहिती करून घ्या, मी कोण आहे, कोणती बॅच आहे, कुठलं... सगळी माहिती करून घ्या आणि मग बोला.*स्थानिक अधिकारी:* साहेब, विषय तुमच्या बॅचचा नाहीये, विषय काय आहे? तुम्हाला आदेश औरंगाबादचे आहेत ना साहेब. तुम्हाला सध्या माहीत आहे का? तुम्हाला सध्या संभाजीनगर आणि वैजापूरमध्ये काय चाललंय माहीत आहे का साहेब?*योगेश मोरे:* नाही माहिती साहेब आम्हाला, माहीत राहायचं...*स्थानिक अधिकारी:* तुम्हाला माहीत नाही तर गाडीवाला तुम्हाला फोन करतोय ना?*योगेश मोरे:* कोण फोन करतंय?*स्थानिक अधिकारी:* गाडीवाला फोन करतोय, तुम्ही त्याचा फोन का घेत नाही?*योगेश मोरे:* गाडीवाल्याला... गाडीवाल्याला आम्ही हेच सांगितलं की मुंबईचा स्क्वाड आहे, गाडीवाल्याशी आम्ही का...*स्थानिक अधिकारी:* अहो साहेब, मुंबईचा सगळ्या जगदुनियेला माहीत आहे, इंटरस्टेट कॉसिंग... इंटरस्टेट स्क्वाड आहे.*योगेश मोरे:* इंटरस्टेट जर केलेत ना, तर गाडी आहे... गाडी जी आहे ती दोन वर्षांपासून टॅक्स ड्यू, फिटनेस ड्यू आणि ओव्हरलोड...*स्थानिक अधिकारी:* ऐका, ऐका, विषय... ते सगळं कायद्याचा विषय बाजूला राहिला. कायद्याचा विषय बाजूला राहिला. सध्या काय इथं चालू आहे तुम्हाला माहीत नाहीये साहेब.*योगेश मोरे:* माहीत नाही म्हणूनच तर सांगतो क्लिअर कट माहीत नाही...*स्थानिक अधिकारी:* माहीत नाही तर समोरचा जेव्हा माहिती देतोय ना, वैजापूरच्या हद्दीतल्या, द्या ना तुम्ही विषय सोडून साहेब. मी तुम्हाला कारवाया करू नका नाही म्हणत आहे. पण ज्या कार्यालयासाठी तुमचा आदेश झालेला आहे, त्या कार्यालयात तुम्ही काम करा ना!*योगेश मोरे:* करतोय ना आम्ही, पण आता हे रस्त्यावर वैजापूरचं कुठून कुठपर्यंत आहे, औरंगाबादचं...*स्थानिक अधिकारी:* तुमचं... तुमचं जसं तुम्ही श्रीरामपूरला आहे, ऐका ना, जसं तुम्ही श्रीरामपूरला आहे, जसं नगर-श्रीरामपूर करता तसंच करायचंय हे!*योगेश मोरे:* नगर-श्रीरामपूरचं आम्हाला क्लिअर कट माहितीये साहेब, आणि आम्ही त्यांच्या हद्दीमध्ये...*स्थानिक अधिकारी:* हो मग आता जर तुम्ही नगर... तुम्ही श्रीरामपूरवरून आलेले आहात, ऐका तर, तुम्ही जसं श्रीरामपूरवरून आलेले आहात, तर मग इथं दोन कार्यालयं आहेत वैजापूर आणि औरंगाबाद हे तुम्हाला ज्ञात असताना, तुम्ही माहिती समोरचा माणूस देत असताना, त्याला टाळून कारवाई करणं हे योग्य आहे का?*योगेश मोरे:* साहेब, गाडी मालकाशी बोलून तो काही खरी माहिती देईल याची काय गॅरंटी असते का?*स्थानिक अधिकारी:* हो मग तो खरी माहिती नाही देणार, तर वैजापूरच्या अधिकाऱ्यांना कन्फर्म करायला पाहिजे तुम्ही. आम्हाला... आम्हाला स्वप्न पडलंय का मोरे साहेब तिथे उभे आहेत म्हणून? वैजापूरची हद्द कुठून कुठे चालून गेली हेच माहिती नाही ना, आम्ही आलोच समृद्धीवरून...*स्थानिक अधिकारी:* नाही नाही, मग तुम्हाला माहीत नाही ना साहेब, जर तुम्हाला डाऊट अराईज झाला ना, तुम्ही माहिती घ्या ना!*योगेश मोरे:* नाही या गोष्टी मला असं वाटतंय हे चुकीचं होतंय कारण...*स्थानिक अधिकारी:* हे चुकीचं तुम्ही चुकीचं करताय साहेब, ऐका ना. तुम्ही चुकी... तुम्ही म्हणजे माहिती घेण्याची तुम्हाला पॉसिबिलिटी असताना सुद्धा ती माहिती न घेता तुम्ही कारवाई करून म्हणताय की भारत-पाकिस्तान आहे का, हे चुकीचं आहे.*योगेश मोरे:* ठीक आहे...*स्थानिक अधिकारी:* मला वै... तुमचं श्री... मला तुमचं श्रीरामपूर लागूनच आहे वैजापूरला, मी म्हणू का मग भारत-पाकिस्तान आहे का म्हणून पुढच्या महिन्यापासून?*योगेश मोरे:* साहेब, आम्ही तेच सांगतोय की आम्हाला नाशिकच्या गाड्या आमच्या हद्दीमध्ये येऊन पण कारवाई करतात, नगरच्या कडे आम्ही पण जातो, आम्ही थोडं फार गेल्याने काही त्याच्याने खूप व्हायलेशन होत नाही.*स्थानिक अधिकारी:* ओ साहेब, विषय ऐका ना, इथं कारवाई केल्याने व्हायलेशनचा विषय नाहीये. औरंगाबादच्या हद्दीमधल्या गाड्या अवैधपणे, बोगस राजू नागरी नावाचा सस्पेंडेड इन्स्पेक्टर चालवतो, ते मला इथं चालू द्यायचं नाहीये. तुम्ही जसं कायद्यानं येऊन काम करताय ना, तसं आम्ही वैजापूरला कायद्यानं काम करतोय, अन औरंगाबादला राजू नागरी कायद्यानं काम नाही करत आहे.*योगेश मोरे:* बरं बरं, ठीक आहे, तुमचं त्यांचं आता आम्हाला त्याबद्दल न बोललेलं...*स्थानिक अधिकारी:* तुम्हाला त्याच्याबद्दल नाही ना, मला हे बघा, मला ना तुमची बॅच माहीत आहे, ना मला तुमचं काहीच माहीत नाहीये. इन शॉर्ट कट मध्ये मी तुम्हाला जे बोलतोय काही आउट ऑफ... ऐका ना...*योगेश मोरे:* तुम्ही धनवे साहेबांशी बोलून घ्या, धनवे साहेबांशी...*स्थानिक अधिकारी:* नाही नाही, मला... मला तुमचं ऐका, माझं तुमचं वैयक्तिक काही नाहीच आहे.*योगेश मोरे:* म्हणून मी सांगतोय...*स्थानिक अधिकारी:* फक्त तुम्ही काम करत असताना, तुम्ही काम करत असताना वैजापूर आणि औरंगाबाद मधला भेद ठेवा साहेब. आणि त्या गाड्या आमच्या... आमच्याकडे लिस्ट विस्ट काही नाही पण आहे. माझ्याकडे लिस्ट पण नाहीये, मी तुम्हाला साध्या फोनवर बोलतोय, माझ्याकडे लिस्ट नाही ना मी त्याचे पैसेही घेत नाही कुणाचे. पण वैजापूरच्या गाडीला नवीन आलेल्या औरंगाबादच्या स्क्वाडनं कुणाच्या सांगण्यावरून दंड दिला यासाठी मी फोन केलेला आहे.*योगेश मोरे:* कुणाच्याही सांगण्यावरून काही नाही साहेब, मला ती गाडी दिसली, ती गाडी चेक केलं, टॅक्स संपलेला होता, फिटनेस संपलेला होता, गाडी ओव्हरलोड...*स्थानिक अधिकारी:* तुम्ही सरसकट... सरसकट... सरसकट करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे...*स्थानिक अधिकारी:* पण कारण नसताना, कारण नसताना वैजापूरच्या वाहनांना, कारण नसताना वैजापूरच्या... भले ठीक आहे हद्दीचा... हद्दीचा नाही का हद्दीचं कन्फ्युजन असू शकेल, कुठे बोर्ड लावलेले नाहीयेत.*योगेश मोरे:* कारण भरपूर कन्फ्युजन...*स्थानिक अधिकारी:* पण काय होतंय, काय होतंय तो... तोच माणूस आहे ना दररोज... दररोज नाही का दररोज दररोज त्याच त्याच माणसाच्या गाड्या पकडून तिथेच दंड दिला जातोय, तुम्हाला माहीत नसावं.*योगेश मोरे:* नाही ते नाही माहिती साहेब.*स्थानिक अधिकारी:* मग, ही इन्टेंशली असू शकतं ना?*योगेश मोरे:* नाही, मला माहितीच नाही ना, इन्टेंशली मला कसं कळेल साहेब की बाकीच्या स्क्वाडने पण इथंच केस दिले हे मला नाही माहिती ना.*स्थानिक अधिकारी:* मग जसं... जसं बाकीच्या स्क्वाडने तुम्हाला केलेलं नाही, दिलेलं नाही माहीत, मी तुम्हाला कारवाई करू नका म्हणत नाहीये साहेब. तुम्ही कारवाई करा, पण जेव्हा तुम्ही आलात तर ड्रायव्हरला तुम्ही दोन ऑफिसेस आहेत तर हद्द विचारायला पाहिजे, समोरचा माणूस सांगतोय तर...*योगेश मोरे:* ड्रायव्हरने पण मला नाही...*स्थानिक अधिकारी:* नाही नाही, हे ड्रायव्हर फिव्हर हे सगळे लाचार आहेत, त्या राजू नागरीचे हे लाचार आहेत सगळे. तर समोरचा गाडीवाला जर सांगत असेल तर वैजापूरच्या संबंधितांना तुम्ही फोन करायला पाहिजे.*योगेश मोरे:* बरं, मी शक्यतो मालकांशी बोलत नाही साहेब फोन करताना, कारण ते एक वेगळंच काहीतरी बोलतात, कुणाचातरी आमदार, खासदार, हे, ते असं असतं. त्यामुळे ते न बोललेलं...*स्थानिक अधिकारी:* तेव्हा मला सांगा जेव्हा तुम्ही भारत-पाकिस्तान या हद्दीचा रेफरन्स घेता, याचा अर्थ तुम्ही निडर अधिकारी आहात. मग आमदार अन खासदाराने काय फरक पडावा? तुम्ही कमीत कमी आम्हाला फोन करा ना, वैजापूरला आलात तर तुम्ही आम्हाला फोन करा.*योगेश मोरे:* फरक कोणालाच पडत नाही साहेब, आम्ही त्यांनाही बोलतो, त्यांच्याशी बोलून पण होतं असं की वेळ जातो. आणि एवढं करून सुद्धा त्या मालकाने ड्रायव्हरला काय सांगितलं, गाडी हलवू नको, शेवटी आम्हाला ती केस देऊन सोडून द्यावी लागली, गाडी हलवू नको...*स्थानिक अधिकारी:* गाडी हलवू नको याच्यामुळे सांगितलेलं असतं साहेब, तिथे दोन गावं औरंगाबादमध्ये, अन लगेच परत औरंगाबाद चालू होतं, मध्येच वैजापूर आहे. मग परत कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको की गाडीला दंड दिला कुठे, कुणाच्या हद्दीत, यासाठी ते गाड्या हलवत नाहीत त्या दोन गावांच्या मधनं. बरं...*स्थानिक अधिकारी:* माझी तिथे यादी, लिस्ट, पिस्ट, पैसे पिसे जसं तुमचं चालतंय श्रीरामपूरला तसं काही नाहीये, मी हे सगळं बंद करणार आहे. पण एकाच माणसाला दररोज त्याच लोकेशनला तुम्ही पकडताय म्हणजे काय आहे हे?*योगेश मोरे:* नाही, त्याच्या गाडीवर तर काही दंड नव्हता अगोदरचा, ही त्याची पहिलीच केस होती...*स्थानिक अधिकारी:* अहो एकाच माणसाच्या दोन गाड्यांना तुम्ही पकडताय, हे बोलतोय मी साहेब.*योगेश मोरे:* मला नाही आयडिया बरं का साहेब, मागच्या त्याला पण मागच्या गाडीला केस झाली की काय, मी त्या माणसाशी बोललो नंतर, मालकाशी पण मी बोललो, त्याला म्हटलं चलन झालेलं आहे...*स्थानिक अधिकारी:* माझं तुमचं काही वाद नाही, फक्त तुम्ही चोरांच्या सहभागा... सोबत नसावं हे मला चेक करायचंय. माझं तुमचं काही वाद माझं तुमची ओळख पण नाही.*योगेश मोरे:* हो ओळख नाही सर, म्हणून तुम्ही माहिती घेऊन घ्या, माझा तसा स्वभाव नाहीये म्हणूनच म्हटलं मी की तुमचे जे पण तुम्ही...*स्थानिक अधिकारी:* तुम्ही आता इथे आलेले आहात ना, तुमचे जेवढे स्क्वाड आलेत त्यांना स्पष्ट सांगा, औरंगाबादमध्ये जो बदमाश राजू नागरी सस्पेंडेड मोटर वाहन निरीक्षक आहे, त्यानं हे कार्यालय वेठीस धरलेलं आहे, इथं तो वसुली रॅकेट चालवतो.*योगेश मोरे:* हम्म...*स्थानिक अधिकारी:* तुम्ही त्याची माहिती न घेता कामं करताल तर मग आम्हाला काही... आमच्याकडे पण कायदा आहे साहेब, तुम्ही बेकायदेशीर लोकांच्या वतीने काम करताय.*योगेश मोरे:* आम्ही बेकायदेशीर... संबंधच नाही ना साहेब, आमचं काय घेणं देणं, आम्हाला जी ऑर्डर आली त्या पद्धतीने आलो आम्ही. आम्हाला काही इथं येऊन हे करायचं होतं का? काही घेणं देणं...*स्थानिक अधिकारी:* अहो, मग तुम्ही लोकली जॉग्राफीची माहिती घेताय, जॉग्राफीची माहिती...*योगेश मोरे:* पण ते कसं असतं की ती जॉग्राफीच तुमची वैयक्तिक...*स्थानिक अधिकारी:* आणि दंड, ज्या वाहनांचा टॅक्स भरलेला नाही, जे ओव्हरलोड आहेत त्यांना १०० टक्के दंड करा, माझं काही म्हणणं नाही. पण लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करू नका.*योगेश मोरे:* जाणीवपूर्वक नाही केलं साहेब, तुम्ही गैरसमज करताय. त्या गाडीचा दोन वर्षांपासूनचा टॅक्स ड्यू होता २४ मध्ये...*स्थानिक अधिकारी:* अहो त्याला सोडू नका ना, मी कुठे म्हणतोय तुम्ही त्याला सोडा. पण कसं समोरचा जर गाडीवाला सांगत असेल ना साहेब, आपलं काम आहे ऐकून घेणं. गाडी... मला सांगा ही कसली चेकिंग आहे, गाडीवाल्याचा फोन काढून घेणे... आता मला तुमची बॅच माहीत नाही साहेब.*योगेश मोरे:* कोणी फोन काढून घेतला?*स्थानिक अधिकारी:* तुम्ही त्याचा त्याला फोनवर संधीच देत नाही ना सांगणं, त्याचं म्हणणं ऐकत नाहीये ना तुम्ही.*योगेश मोरे:* साहेब, विचारा साहेब तुम्ही चुकीची फिडिंग झाली तुम्हाला, तो जर गाडी... फोन घेतला असता तर त्याची गाडी नसती का आरटीओ ऑफिसला रवाना केली? त्या मालकाशी सुद्धा बोललो नंतर मी. तो म्हणे मी इथं येतो, तिथं येतो, तुम्ही १० मिनिटं थांबा, १० मिनिटं थांबा...*स्थानिक अधिकारी:* जाऊद्या, मला जास्त वेळ पण नाही साहेब तेवढा. फक्त तुम्ही हद्द माहीत करून घ्या, आणि वैजापूरचं काहीही जरी तुम्हाला... ऐकून घ्या ना, जसं तुम्ही म्हणला नाशिक...*योगेश मोरे:* चुकीच्या फिडिंगवर बोलू नका साहेब.*स्थानिक अधिकारी:* चुकीच्या फिडिंगवर नाही बोलत आहे, एकतर तुम्ही नाही का, तुम्ही ऐका ना, एकतर तुम्हाला ज्या कार्यालयाचा आदेश नाही त्या कार्यालयात येऊन तुम्ही चेकिंग करता.*योगेश मोरे:* मग तुम्ही...*स्थानिक अधिकारी:* मग केली काय हरकत नाही, काय हरकत नाही.*योगेश मोरे:* रस्त्यावर आम्हाला हे कसं कळणार कुठून कुठपर्यंत आहे ते?*स्थानिक अधिकारी:* मग विचारायला पाहिजे ना, नवीन लोकं जसं... जसं नवीन बाहेरचे पोलीस स्टेशनवाले जसं नाही का पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्यावर विचारतात तिथल्या लोकांना की बाबा हे आमचं कसं मदत करायची. तुम्ही डायरेक्ट आदेश आला म्हणून काही पण तुम्हाला स्वैराचारासाठी नाहीये आदेश, तुम्ही असं बोलू नका, मी तुम्हाला समजून घेतोय इट डझन्ट मीन की तुम्ही बोलाल. तुम्ही वैजापूरमध्ये येऊन जर काम करत असाल, तर बिंग डेप्युटी आरटीओ तुम्ही मला सांगणं आवश्यक आहे.*योगेश मोरे:* ठीक आहे साहेब...*स्थानिक अधिकारी:* तुम्ही माझी टॅक्सची ड्यू गाडी असेल काय असेल, हे तुम्ही मला किमान कळवणं आवश्यक आहे साहेब, असं बिलकुल नाही बोलू शकत तुम्ही.*योगेश मोरे:* आम्हाला हे माहीत तर पाहिजे की कुठून कुठपर्यंत...*स्थानिक अधिकारी:* माहीत पाहिजे हे तुमचा भाग आहे साहेब, मी जर श्रीरामपूर नगरला चेकिंगला गेलो तर माहिती करून घेणं माझी जबाबदारी आहे, तुम्हाला माहिती करून देणं जबाबदारी माझी नाहीये. तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुमच्याकडे नाही.*योगेश मोरे:* ठीक आहे, ठीक आहे.*स्थानिक अधिकारी:* तुम्ही असं बळच... मी तुम्हाला समजून घेतोय याचा अर्थ तुम्ही ते रेटू नका मला, मला माहीत नाही तुमची बॅच, लिस्ट काय आहे तर.*योगेश मोरे:* रेटण्याचा प्रश्नच नाही साहेब...*स्थानिक अधिकारी:* तुम्ही माझ्या भागात आलेले आहात, तुमचं काम आहे मला रिपोर्ट करणं. मला विचारणं तुमचं काम आहे साहेब.*योगेश मोरे:* आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही आपलं...*स्थानिक अधिकारी:* तुमचं काम माझ्या भागात आल्यानंतर मला रिपोर्ट करणं काम आहे, तुम्ही काय कोणत्या गाड्या पकडायच्या पकडा, वैजापूरला जाऊन चेकिंग करा. पण तुमचं काम आहे मला सांगणं.*योगेश मोरे:* बरोबर आहे.*स्थानिक अधिकारी:* मग इथून जा वैजापूरला, करा तिकडे चेकिंग. मला सांगा पण, मी आलेलो आहे, मी हे काम करतोय म्हणून. तुम्ही असा कोणत्याही बॅचचे.*योगेश मोरे:* ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही साहेब. हरकत नाही.
