एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: जन्मदाते फिरले अन् सासरचेही दुरावले! नवऱ्याने निर्घृणपणे संपवलेल्या पूजाचा भयंकर शेवट; अखेर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: अंत्यसंस्कार करण्यास सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने, शेवटी पोलिसांनी तिच्या दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील करमाड परिसरातील पेट्रोल पंपावर घटस्फोटीत पत्नीचा तिच्याच दुसऱ्या पतीकडून चाकूचे वार (Crime News) करत खून करण्यात आला होता. त्याच मृत पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु, करमाड) वर अंत्यसंस्कार करण्यास सासर आणि माहेरच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने, शेवटी पोलिसांनी तिच्या दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

 मृत पूजा गावंडे हिचा दुसरा विवाह विवाह 5 नोवेंबर 2025 आळंदी येथील आर्य समाजभवनात सत्यम गावंडे यांच्यासोबत झाला होता. तो नेहमी तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता, तसेच तिला पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी त्याचा विरोध होता. या छळाला कंटाळून पूजाने 14 फेब्रुवारी 2026 रोजी बॉण्ड पेपरवर करारनामा करून त्याला घटस्फोट दिला होता, याचा राग मनात धरून सत्यमने गुरुवारी (ता ९) दुपारी तिचा गळा चिरून निर्घृण खून केला. नंतर पोलिसांनी तपास तर एक दोन तासात सत्यमला अटक केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; दुसरं लग्न केलं पण भयंकर शेवट झाला

छत्रपती संभाजीनगरमधील करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेचा संपवलं. ती काम करत असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) तिला निर्घृणपणे सपंवलं. ही घटना करमाडच्या गणपती मंदिराजवळ असलेल्या पेट्रोल पंपावरती काल गुरुवारी (दि. ९) दुपारी १२.३० वाजता घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर दोन तासात अटक केली.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं?

दोघांचे वाद होऊ लागल्याने पुजा काही दिवसांपासून करमाडला राहत होती. गेल्या दीड महिन्यापासून ती आपल्या मुलांसाठी करमाड या पेट्रोल पंपावर नोकरी करत होती. ती गुरुवार सकाळी ९.३० वा. पेट्रोल पंपावर आली. पंपावर ड्यूटी सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक तिचा पती दुचाकीवरून पंपावर आला. पंपाच्या स्टॅडजवळ त्याने दुचाकी उभी करून पत्नी पूजाला पकडलं. पूजाने त्याच्या हातातून सुटून लांण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमने गाडीवरून उतरून मागून जाऊन तिला पकडलं. पूजाचा गळा पकडून पाठीत चाकूने वार करून तिला जमिनीवर पाडले. यानंतर धारदार चाकूने गळा चिरला. आवाज ऐकून पेट्रोल पंपाच्या मालकाने सत्यमला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तो घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला. (Chhatrapati Sambhajinagar Crime News) 

ही सर्व थरारक घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी सत्यम पूजाची हत्या करण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपावर आला होता. परंतु, पंपावर गर्दी असल्याने तो परत गेल्याची माहिती आहे. दुपारी पंपावर वाहनांची गर्दी नसताना तो पुन्हा आला आणि त्याने अत्यंत क्रुरतेने पत्नीला संपवलं. या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला दवाखान्यात दाखल केले,मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.(Chhatrapati Sambhajinagar Crime News) 

Chhatrapati Sambhajinagar: पहिल्या पतीची आत्महत्या नंतर दुसरं लग्न केलं अन्...

पूजाचं पहिल लग्न चित्ते पिंपळगाव येथील सुदाम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झालं होतं. घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. त्यानंतर पूजाने १५ नोहेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडे सोबत देवाची आळंदी येथे आर्य समाज संस्थेत विवाह केला. पूजाला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु, दीड महिन्यापूर्वी सत्यम याच्यासोबत काही वाद झाल्यामुळे ती करमाडला राहण्यासाठी आली होती.(Chhatrapati Sambhajinagar Crime News) 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : सत्ताधारी नगसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी? इम्तियाज जलील यांच्या प्रश्नावर मनपा आयुक्तांची सारवासारव
सत्ताधारी नगसेवकांच्या अवैध बांधकामावर बुलडोझर कधी? इम्तियाज जलील यांच्या प्रश्नावर मनपा आयुक्तांची सारवासारव
Chhatrapati Sambhajinagar Crime:  एमआयएमला आणखी एक धक्का; बनावट बोनाफाईडच्या आधारे निवडणूक लढवली; नगरसेवक मेराज खानला अटक, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
एमआयएमला आणखी एक धक्का; बनावट बोनाफाईडच्या आधारे निवडणूक लढवली; नगरसेवक मेराज खानला अटक, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
Imtiaz Jaleel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?
Nida Khan Home Demolition : मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, 'त्या' घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीनदोस्त; मोठ्या बंदोबस्तात कारवाई
मतीन पटेलांना मोठा दणका; जिकडे निदा खानला लपवलं, 'त्या' घरावर चालला पालिकेचा बुलडोझर; घरही जमीनदोस्त; मोठ्या बंदोबस्तात कारवाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget