एक्स्प्लोर

HSC Exam : 12 वी इंग्रजी पेपरमध्ये मोठा गैरप्रकार उघड; 19 पर्यवेक्षकांवर कारवाई, CCTVमुळे फसवणूक उघड

HSC Exam : दक्षता समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गैरप्रकाराची गंभीरता लक्षात घेता परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (ता. कन्नड) येथे इयत्ता 12 वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रावरील CCTV फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दक्षता समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने संपूर्ण तपास पूर्ण केला.

CCTV फुटेजमधून गैरप्रकार उघड (CCTV Exam Malpractice Case)

दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या इंग्रजी परीक्षेदरम्यान काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून नक्कल करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील CCTV फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली. फुटेजमध्ये विद्यार्थ्यांच्या हालचाली स्पष्ट दिसून आल्या असून, गैरप्रकार सिद्ध झाल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई केली.

19 जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित (Action Against 19 Supervisors)

या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण 19 जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्राचा संपूर्ण स्टाफ बदलला (Exam Center Staff Replaced)

गैरप्रकाराची गंभीरता लक्षात घेता परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलण्यात आला आहे. पुढील सर्व परीक्षा शिस्तबद्ध आणि नियमानुसार पार पडाव्यात यासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. “उपरवाला सब देख रहा है” या म्हणीचा प्रत्यय देणारी ही कारवाई असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

प्रशासनाचा स्पष्ट संदेश (Strict Action Against Copying)

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर आणि विस्तार अधिकारी सिताराम पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईतून परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. CCTV यंत्रणेमुळे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा:

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Shortage Impact: पाणीटंचाईच्या काळात पाणी जसं वापरतो तसा गॅस जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पाणीटंचाईच्या काळात पाणी जसं वापरतो तसा गॅस जपून वापरा; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Arun Tupe Death: महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
महाराष्ट्राला हसवणाऱ्या लोकप्रिय रिलस्टारचं निधन; राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, 24 तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget