Chhatrapati Sambhajinagar : 3 मुलं पोरकी झाली, हंबरडा फोडला, डोळ्यादेखत आई गेली, संभाजीनगरात भिंत कोसळून भीषण दुर्घटना
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात बुधवारी (11 जून 2025) हृदय पिळवटून घटना घडली.

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात (Sambhajinagar Siddharth Garden wall collapsed) बुधवारी (11 जून 2025) हृदय पिळवटून घटना घडली. उद्यानाच्या आतल्या एका जुनाट भिंतीचा भाग अचानक कोसळला आणि त्या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार या दोघीही उद्यानात काम करणाऱ्या महिला कर्मचारी होत्या. 35 वर्षांची स्वाती खैरनाथ आणि 38 वर्षांची रेखा गायकवाड असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. या दुर्घटनेत आणखी पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
3 मुलं पोरकी झाली, हंबरडा फोडला, डोळ्यादेखत आई गेली...
या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) हादरून गेला आहे. स्थानिकांनी महापालिकेच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे. मृतांमध्ये 35 वर्षीय स्वाती खैरनाथ यांचा समावेश असून त्यांच्या मृत्यूनं तीन लहान मुलं अक्षरशः अनाथ झाली आहेत. डोळ्यादेखत त्यांची आई गेली, त्यामुळे मुलांचे अश्रू काही थांबेनात. स्वातींच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे.
जोरदार वादळ अन् पाऊस
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Rain News) सायंकाळच्या वेळी जोरदार वादळ आलं होतं. त्यानंतर पावसाच्या सरी देखील कोसळल्या. या दरम्यान सिद्धार्थ उद्यानातील (Siddharth Garden wall collapsed) प्रवेशद्वाराच्या भिंतीचा भाग कोसळला आणि यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी पोहोचून महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेनंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वाची माहिती दिली.
आयुक्त जी. श्रीकांत काय म्हणाले?
भिंत व गेट परिसरातील बांधकाम बीओटी तत्वावर खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराचीच होती. या अपघातामागे ठेकेदाराची हलगर्जीपणा दिसून येतो, त्यामुळे त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे," अशी माहिती आयुक्त श्रीकांत यांनी दिली.
तर, सात दिवस गार्डन बंद ठेवण्यात येणार असून, चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण उद्यान आणि इतर बांधकामांची ऑडिट तपासणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हे ही वाचा -

























