Bhagwat Karad On Maha Vikas Aghadi : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आज महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) तीनही पक्षाची एकत्रित सभा होणार आहे. दरम्यान, याच सभेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. तर भाजपकडून (BJP) देखील महाविकास आघाडीच्या या सभेवर टीका केली जात आहे. तर केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad ) यांनी देखील वज्रमूठ सभेवरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. "विचार नसलेली वज्रमूठ केवळ भाजपच्या विरोधात असून, ती मुठ कधीही एकत्रित राहू शकणार नाही,” असे कराड म्हणाले आहे. 


दरम्यान, यावर बोलताना कराड म्हणाले की, सभेत होणाऱ्या टीकेला आम्ही डगमगणारे नाहीत, आम्ही त्याला लवकरच उत्तर देऊ. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सावरकरांचे कौतुक करतात आणि काँग्रेसचे नेते सावरकर यांच्यावर टीका करतात हा विरोधाभास आहे. त्यामुळे ही विचारांची वज्रमूठ नसून, केवळ भाजपला विरोध करण्यासाठी वज्रमूठ असल्याचं कराड म्हणाले. 


भारत मातेचं पूजन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य आहे का? 


पुढे बोलताना कराड म्हणाले की, आमची गौरव यात्रा ताकत दाखवण्या साठी नाही. सावरकरांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आमची ही सावरकर गौरव यात्रा आहे. सभा आणि सावरकर गौरव यात्रा एका ठिकाणी येणे योगायोग आहे. ही महाविकास आघाडीची सभा संपूर्ण मराठवाड्याची असून, केवळ छत्रपती संभाजीनगरची नाही. पण आमची गौरव यात्रा फक्त एका मंडळाची आहे. तसेच, भारत मातेचं  पूजन महाविकास आघाडीमध्ये अनपेक्षित मात्र आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच शिवसेना गट भारत मातेचं पूजन करत आहे. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हे पूजन मान्य आहे का? असा सवाल कराड यांनी उपस्थित केला आहे. 


महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका...


दरम्यान, महाविकास आघाडीच्या सभेलमध्ये उपस्थितीत राहणाऱ्या नेत्यांवर देखील कराड यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे हाऊट झालेले नेते आहेत. शिवसेना फुटल्यामुळे त्यांना तात्पुरते महत्त्व प्राप्त झाले आहे. अंबादास दानवे त्यांच्या खालचा नेता शेकडो किलोमीटर पुढे गेला आहे. त्यामुळे खैरे यांची तथ्यहीन आणि वायफळ बडबड सुरू असते. तसेच मी कधीही खैरे यांच्यासोबत  डिबेट करायला तयार आहे. मी केलेली दहा कामं त्यांना वीस वर्षात करणे जमले नाही, असे कराड म्हणाले. तर नाना पटोले, अशोक चव्हाण यांची भूमिका सावरकरांच्या विरोधात असल्याचं देखील ते म्हणाले. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


मविआची वज्रमुठ अन् शिवसेना-भाजपची सावरकर गौरव यात्रा; छ. संभाजीनगरमध्ये असा रंगतोय पॉलिटिकल ड्रामा