छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठणच्या कारकीन येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडने घाव घालून हत्या (Murder) केली आहे. विशेष म्हणजे आधी राहत्या घरात पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्यावर जखमी अवस्थेतच तीला आरोपीने गावाच्या चौकात आणून सोडून दिले, आणि त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी फरार होणाऱ्या आरोपी पतीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सोनाली आतिष ताकवाले (वय 25 वर्षे) असे मयत महिलेच नाव असून, आतिष रावसाहेब ताकवाले (वय 30 वर्षे) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि आतिष कारकीन गावात आपल्या मुलीसह राहतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान काहीतरी कारणावरून सोनालीने आपल्या मुलीला मारहाण केली. त्यामुळे मुलीला मारू नको म्हणत आतिषने भूमिका घेतल्याने पत्नी पत्नीमध्ये वाद झाला. सुरवातीला शाब्दिक वाद थेट हाणामारीपर्यंत गेला आणि अतिष प्रचंड रागात होता. त्यामुळे त्याने थेट घरातील कुऱ्हाडीने सोनालीवर वार केला. ज्यात सोनाली गंभीर जखमी झाले.
भर रस्त्यात मानेवर व गळयावर वार करून जागीच ठार केले.
सोनालीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्यावर ती जागीच कोसळली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. मात्र, त्यानंतर देखील अतिषचा राग कमी झाला नाही. सोनाली गंभीर जखमी झाल्यावर देखील त्याने तिला गावातील रस्त्यावर ओढूत आणले. तसेच पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार करून जागीच ठार केले. त्यानंतर तो मुलीला घेऊन फरार झाला. दरम्यान, याची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी पाठलाग करून पकडला आरोपी...
कारकीन गावातील रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता हा मृतदेह सोनाली आतिष ताकवाले यांचा असल्याचे समोर आले. दरम्यान, आतिष ताकवाले आणि त्याची मुलगी घरात दिसत नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता आतिषनेच सोनालीची हत्या करून फरार झाला असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने अतिषचा शोध सुरु केला. तसेच त्याचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. यावेळी आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पैठण एमआयडीसी पोलिसांत त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: