छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाबाबत एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा. मग व्यक्ती असेल, पुढारी असेल किंवा पक्ष असेल. राजकीय नेते ओबीसींसाठी काय निर्णय घेतात याकडे सर्व समाजाचे लक्ष लागून राहिलं आहे. कुणावर अन्याय करतात हे सुद्धा पाहतोय. पक्ष चालवायचे आहे त्यामुळे नीट विचार करा, असा थेट इशारा छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दिलाय.  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ज्या बीड (Beed) जिल्ह्यातून मुंबई  आंदोलनाची घोषणा केली, त्याच बीडमध्ये आज छगन भुजबळ यांची भव्य सभा होत आहे.  त्याआधी भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. 


ओबीसी आरक्षण देखील दोन वर्षात मिळालेले नाही, नेहरुंच्या काळापासून प्रयत्न सुरु होते आणि आम्हाला अजूनही लढावे लागत आहे. ओबीसींसाठी अखेरपर्यंत लढणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. आरक्षण दिलं नाही तर पूर्ण राज्य पेटवून टाकू, लोकांना घाबरवून टाकू असं स्वरुप राज्यात सध्या धारण केलं गेलंय. इतर समाजातील लोक सुद्धा आहेत, हे राज्यात मराठा समाजाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. 


मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाहीये - छगन भुजबळ


मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाहीये , मला आमदारकीची परवा नाही, मला माझ्या मंत्री पदाची परवा नाही, राजकीय भविष्याची परवा नाही ज्यांना परवा असेल ते विचार करत असतील.मला हौस आहे,  म्हणून मी राजकीय नुकसान करून करून घ्यायला तयार आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलं. देशाच्या संपत्तीवर फक्त ठराविक लोकांचा अधिकार आहे का ? असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला. 


सव्वा कोटी येतात की तीन कोटी ते पाहू - छगन भुजबळ


कायदा सुव्यवस्थेचा विचार गृह खातं आणि सामान्य लोक करतील. ते आंदोलन करु शकतात आणि ओबीसी मुंबईत धडकू शकणार नाहीत, असं नाही. सव्वा कोटी लोक येतात की तीन कोटी मुंबईत येतात ते पाहू, असं म्हणत मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनावर छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. 


मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलोय - छगन भुजबळ 


मी सरकारचा नाही तर ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून समोर आहे. सरकार तिकडे, आज इथं आलोय ओबीसींचा प्रतिनिधी म्हणून. कार्यकर्ता म्हणून आलोय. सरकारचं काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारायचं, बाकीचे खूप मंत्री आहेत, त्यांना विचारा काय करायचं ते, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. 


ओबीसींसाठी काय निर्णय घेणार याची वाट पाहतोय - छगन भुजबळ


एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा. मग व्यक्ती असेल,पुढारी असेल किंवा पक्ष असेल. राजकीय नेते OBC साठी काय निर्णय घेतात याकडे सर्व समाजाचे लक्ष लागून राहिलं आहे. कुणावर अन्याय करतात हे सुद्धा पाहतोय. पक्ष चालवायचे आहे त्यामुळे नीट विचार करा, असा थेट इशारा छगन भुजबळांनी दिलाय. 


ओबीसीतूनच मराठा आरक्षणाच्या हवं या भूमिकेवर मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम आहेत, तर ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही,अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीये. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात येत आहे. 


हेही वाचा : 


जेथून मुंबई आंदोलनाची घोषणा झाली त्याच 'बीड'मध्ये ओबीसी मेळावा; छगन भुजबळ काय बोलणार?