APMC Election 2023 Result : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) बाजार समितीप्रमाणेच जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Vaijapur Market Committee Election) देखील भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा असलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिवसेनेनं आपली सत्ता काबीज केलीय. भाजप-शिवसेना युतीला 11 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे वैजापूर बाजार समितिवर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना स्पष्ट बहुमत पाहायला मिळत आहे. 


विजयी उमेदवार


महाविकास आघाडीचे उमेदवार 



  1. अविनाश गलांडे (म वि आ)

  2. संजय निकम (म वि आ)

  3. ज्ञानेश्वर जगताप (म वि आ)

  4. अनिता वाणी (म वि आ)

  5. प्रशांत सदाफळ (म वि आ)

  6. ठोंबरे विजय विश्राम (म वि आ)

  7. शेख रियाज अकिल  (म वि आ)


भाजप-शिंदे गटाचे उमेदवार 



  1. रामहरी बापू (सेना बिजेपी)

  2. काकासाहेब पाटील (सेना बिजेपी)

  3. कल्याण दागोडे (सेना बिजेपी)

  4. कल्याण जगताप (सेना बिजेपी)

  5. शिवकन्या पवार (सेना बिजेपी)

  6. नजन रजनीकांत (सेना बिजेपी)

  7. इंगळे गणेश पोपटराव (सेना बिजेपी)

  8. पवार प्रवीण लक्ष्मण(सेना बिजेपी)

  9. आहेर गोरख प्रल्हाद (सेना बिजेपी)

  10. त्रिभुवन प्रशांत उत्तमराव (सेना बिजेपी)

  11. गायकवाड बाबासाहेब दगु (सेना बिजेपी)


बाजार समिती माहिती...



  • वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा पिकासाठी ओळखली जाते.

  • वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक उलाढाल अंदाजे 3 कोटी 47 लाख आहे. 

  • वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप युतीच्या बळिराजा सहकारी विकास पॅनल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी युतीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत झाली. 


शिवसेना शिंदे गट, भाजप पॅनलचे उमेदवार


सहकार संस्था मतदार संघ: कल्याण दांगोडे, धनंजय धोर्डे, काकासाहेब पाटील, भागिनाथ मगर, रामहरी जाधव, कल्याण जगताप, शिवाजी गोरे, शिवकन्या पवार, अलकाबाई वैद्य, अरुण पवार, रजनीकांत नजन. ग्रामपंचायत मतदार संघ: गणेश इंगळे, प्रवीण पवार, गोरख आहेर, प्रशांत त्रिभुवन, व्यापारी मतदार संघ : सुरेश तांबे, पारस बोहरा हमाल तोलारी मतदार संघ : बद्रिनाथ गायकवाड.


युतीच्या शेतकरी विकास पॅनल उमेदवार


सहकारी संस्था मतदार संघ: संजय निकम, अविनाश गलांडे, रिखब पाटणी, ज्ञानेश्वर जगताप, कचरू डिके, बाळासाहेब भोसले, जगन्नाथ जाधव, अनिता वाणी, द्वारका पवार, प्रशांत सदाफळ, काशिनाथ भालेकर. ग्रामपंचायत मतदारसंघ: उत्तम निकम, अशोक चव्हाण, अमृत शिंदे, यशवंत पडवळ व्यापारी मतदारसंघ: विजय ठोंबरे, शेख रियाज शेख आकील हमाल तोलारी मतदारसंघ : रवींद्र पगारे


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला मोठा धक्का