Ambadas Danve : राज्यभरात लाडकी बहिण योजनेचा बोलबाला सुरू असताना विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे. शिवसेनेचा पहिला महिला मेळावा सिल्लोडमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केलं जाणार आहे. यावरून आज ठाकरे गटाचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हल्लाबोल केला आहे.
सिल्लोड येथील कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा करत आहे. महिलांना अर्ज मंजूर होणार नाही अशी दमबाजी केली जात आहे. लोक जमा होणार नाही यासाठी हा सर्व प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील बहिणी सुरक्षित आहेत का? असा सवाल देखील दानवेंनी (Ambadas Danve) उपस्थित केला आहे. तर माता भगिनी सुरक्षित नाहीत. दुसरीकडे लाडकी बहीण म्हणत आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अब्दुल सत्तार काय बोलले होते, आता त्या सत्तारांकडे 'लाडकी बहीण' योजना (ladki bahin yojana) कार्यक्रम आयोजित करत आहे, अशा शब्दांत दानवेंनी (Ambadas Danve) हल्लाबोल केला आहे. मोठा पराभव होणार असल्याने फसवणूक योजना घोषित केल्या जात आहे. 7 लाख हजार कोटी राज्यावर कर्ज आहे. निवडणूकनंतर योजना देणार नाही, असंही दानवेंनी (Ambadas Danve) यावेळी बोलताना म्हटलं आहे.
विधानसभेची निवडणूक काही महिन्यामध्ये पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच शिवसेना या महिला मेळाव्यांच्या माध्यमातून घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण' योजना (ladki bahin yojana) गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. सरकारमधील तिन्ही पक्ष यासाठीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
लाडकी बहिण योजने प्रसार करण्यासाठी राज्यभरात मेळावे
'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने'ला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेतले झाणार आहेत. राज्यात 'लाडकी बहीण' योजना (ladki bahin yojana) ला उत्सफुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे, या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 80 लाखाहून अधिक अर्ज शासनाकडे आले आहेत. या योजनेचा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्याची माहिती आहे. राज्यातील शिवसेनेचा पहिला महिला मेळावा हा उद्या सिल्लोडमध्ये पार पडणार आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले आहे.