Agriculture News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि अमरावती (Amravati) महसूल विभागात जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी शेतकऱ्यांना 1 हजार 71 लाख 77 हजार वितरित करण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली आहे. या दोन्ही विभागांतील एकूण 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ज्यात, अमरावती विभागातील एकूण 7 लाख 63 हजार 23 शेतकऱ्यांना 557  कोटी 26  लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 6 लाख 46 हजार 295 शेतकऱ्यांना 435 कोटी 74 लाख रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत पीक नुकसानीसाठी मिळणार आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 

जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने पंचनामे करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक कृषी विभागसह महसूल प्रशासनाकडून पंचनामे करून अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता या नुकसानीची भरपाईला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे देखील पाहणं महत्वाचे असणार आहे. 

आता पुन्हा पंचनामे करण्याची मागणी? 

जून जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी मोजक्याच काही भागात झाली होती. मात्र, इतर भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे अजूनही अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरीपाचे पीकं हातून गेली असून, त्यांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात परिस्थिती गंभीर असून, अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे. 

कोणत्या जिल्ह्याला किती निधी? 

छत्रपती संभाजीनगर विभाग

जिल्हा  लाभार्थी शेतकरी  मदतीची रक्कम 
जालना  282 33 लाख 59 हजार 
परभणी  201 27 लाख 75 हजार 
हिंगोली  27,742 14 कोटी 54 लाख 28 हजार 
नांदेड  6,17,911 420 कोटी 46 लाख 61 हजार 
बीड  127 9 लाख 64 हजार 
लातूर  32 2 लाख 92 हजार 

अमरावती विभाग 

जिल्हा  लाभार्थी शेतकरी  मदतीची रक्कम 
अमरावती  90255 6531.9143
अकोला  200571 14428.811
यवतमाळ  263609 18510.018
बुलढाणा  148423 11540.982
वाशीम  60165 4714.7185

छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला? 

दरम्यान, जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातील काही भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याचवेळी छत्रपती संभाजीनगरच्या काही भागाचे देखील नुकसान झाले होते. यावेळी प्रशासनाकडून पंचनामे देखील केली गेली होती. मात्र, मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या मदतीत संभाजीनगर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

चिंता वाढणार! बीड जिल्ह्यात 79 टक्के पाऊस, धरणांमध्ये केवळ 18 टक्के पाणीसाठा शिल्लक