छत्रपती संभाजीनगर : जंतर मंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर आता कॉकरोच जनता पक्षाचा संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) याने आता केंद्र सरकारला आणखी एक इशारा दिला आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांचे रक्त वाहिलं. विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्रास आणि धमक्या दिल्या जात आहेत. सरकारने सुधारावं, विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. सरकार जर लाईनवर आलं नाही तर विद्यार्थी उद्या सरकारही बदलतील, असा इशारा अभिजीत दिपके याने दिला.
दिल्लीतील आंदोलनानंतर 40 दिवसांनी अभिजीत दिपके हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याच्या आगमनासाठी तरुणांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये येताच तरुणांनी जयघोष सुरू केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजीत दिपके याने क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ जाऊन त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं.
Abhijeet Dipke On Narendra Modi : ... तर सरकारही बदलू
छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजीत दिपकेने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, 36 दिवसांनंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं याचा आनंद होतोय. सरकारने आता तरी सुधारावं. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि रस्त्यावर विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं. एवढं रक्त वाहूनही सरकारचं मन भरलं नाही. आता वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी दिली जात आहे. पोलीस घरी जाऊन विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. सरकारला असंच काम करायचं असेल विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आहे, सरकार लाईनवर आलं नाही तर उद्या सरकारही बदलतील.
ही बातमी वाचा:
