छत्रपती संभाजीनगर : कधी काँग्रेसमध्ये, कधी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत तर कधी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नेहमी सत्तेत असतात. एवढच नाही तर त्यांना मंत्रीपद देखील मिळतो. त्यामुळे अब्दुल सत्तार नेहमी सत्तेत असण्यामागील कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान आता याच प्रश्नाचे उत्तर खुद्द अब्दुल सत्तार यांनीच दिले आहे. “'र' काढून टाकले की, माझ्या नावातच 'सत्ता' येते. माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो, असे सत्तार म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा बँकेची सभा झाली. यावेळी सत्तार यांनी राजकीय टोलेबाजी केली. त्यांच्या या राजकीय टोलेबाजीने जिल्हा बँकेची सभा हास्यकल्लोळाने गाजली. 


कधीकाळी काँग्रेसमधील निष्ठावंत नेते म्हणून ओळख असलेले अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मतदारसंघातूनच भाजप नेत्यांचा विरोध झाल्याने त्यांनी हाती शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. याचवेळी राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली आणि सत्तार यांना राज्य मंत्रीपद मिळाले. दरम्यान पुढे शिवसेनेत बंडखोरी झाली आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. दरम्यान, यावेळी देखील सत्तार यांना मंत्रीपद मिळाले. विशेष म्हणजे राज्यमंत्री पदावरून त्यांची बढती होऊन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे एवढे पक्ष बदलणारे सत्तार नेहमी सत्तेत कसे असतात असे अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, "माझा कुणाशीच पर्मनंट करार नसतो, म्हणून मी नेहमी सत्तेत असतो,” असे उत्तर देऊन सत्तार यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहेत. 


दानवेंची टोलेबाजी...  


दरम्यान, याच सभेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील टोलेबाजी केली. दानवे यांनी नवनियुक्त अध्यक्ष अर्जुन गाढे यांची फिरकी घेताना म्हणाले, तुम्ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालात, पण शिक्काधारी बनू नका. नाही तर सत्तार म्हणतील तिथे मार शिक्का, मार कोंबडा असे करू नका, पुढे काही झाले तर मैं ने तो कुछ नही किया, वो तो अर्जुनने किया असे म्हणायला देखील सत्तार मागेपुढे पाहणार नाहीत, असे सांगितल्याने सभागृहात हशा पिकला.


छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. थकीत कर्जवसुली, अनिष्ट तफावत, दुष्काळ जाहीर करा, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या मुद्द्यावर ही सभा गाजली. विशेष म्हणजे यावेळी सभेस बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आ. हरिभाऊ बागडे यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. त्यामुळे या सभेत अनेक नेत्यांनी राजकीय टोलेबाजी करत एकेमकांना खोचक टोले देखील लगावले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pune News : बाजार समितीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना पणन मंडळामार्फत प्रशिक्षण देणार; अब्दुल सत्तारांची घोषणा