एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस भरतीच्या स्वप्नावर पडलं विरजण! शारीरिक चाचणीवेळी धावताना तरुणाचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना

Chhatrapati Sambhajinagar : मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात पोलिस भरती प्रक्रिया सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलिस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे वय २३ हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. रनिंग सुरू असताना अचानक तो मैदानात कोसळला. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला उचलून घाटी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे (वय २३, मूळ रा. सांगली) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय (SP Office) येथील मैदानावर १६०० मीटर धावताना चक्कर येऊन संग्राम कोसळला. 
संग्रामला तत्काळ मदत करण्यात आली, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये शोककळा पसरली असून, संग्रामच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

काही दिवसांपूर्वी सरावादरम्यान 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

देशसेवा आणि समाजसेवेचं स्वप्न डोळ्यांत साठवून पोलीस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) या 20 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवि अंत झाला आहे. सुशांत भोजने हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे सराव करण्यासाठी घराबाहेर पडला, मात्र, परतलाच नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने पाचोड पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारात मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला त्याचा मृत्यूदेह आढळून आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली. मात्र यावेळी नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली असता आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. तर सुशांतचं पोलिस भरतीचे स्वप्न अधुरेच राहिलंय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अज्ञात वाहनाचा तपास सध्या पोलीस करत आहे.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget