मुंबई : राज्यात एकीकडे रायगड (Raigad)आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला असताना स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2025) कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार, यावरून देखील नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चा आहे. अशातच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजारोहणाची (Independence Day 2025) संधी न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होतं. तर मंत्री भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी मंत्री भुजबळांनी नकारघंटा लावण्याने त्यांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहे. तसे शासनाकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

Continues below advertisement

मंत्री छगन भुजबळांचा तब्येतीच्या कारणास्तव नकार

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे. सध्या त्यांना हालचाल करणे शक्य नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना ध्वजारोहणसाठी जाणे शक्य नव्हतं. त्यामुळे याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळांवर दिली होती. मात्र आता भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण सोहळ्यासाठी जातील. अशी माहिती समोर आली आहे.

रायगडमध्ये अदिती तटकरे, नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनी (independence Day 2025) कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सोमवारी जाहीर केली आहे. या यादीनुसार, रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडमधून अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Continues below advertisement

अजित पवारांच्याहस्ते बीडचे ध्वजारोहण   

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहनासाठी बीडला जाणार आहेत. त्यामुळे, पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहन सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता. 

हेही वाचा