मुंबई : पाणंद रस्त्याच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पाणंद रस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भुमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्यास शासकिय योजनांचा लाभ बंद होणार. असा कठोर निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

राज्यात पाणंद रस्त्यांसाठी रामटेक पॅटर्न राबविण्याचाही प्रस्ताव (Chandrashekhar Bawankule on Panand Road)

पाणंद रस्त्यांच्या संदर्भात राज्य सरकार कठोर भुमिका घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात 40 हजार पाणंद रस्त्यांची कामे सध्या सुरु आहेत. मात्र अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याणे हे रस्ते खोळबंले असल्याचे समोर आले आहे. ही अतिक्रमणे वेळेत काढली नाही तर तात्काळ शेतक-यांचा शासकिय लाभ बंद करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात या रस्त्यांसाठी रामटेक पॅटर्न राबविण्याचाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. पाणंद रस्त्यांसांठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत होतील त्यांना ही लाभ देण्याचा प्रस्ताव सरकार देण्यात आला आहे.

पाणंद रस्ते तयार करण्यासाठी मार्च ते मे हे दोनच महिने मिळत असल्यानं यंत्राच्या साह्याने तयार करण्याचा ही प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाणंद रस्त्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न (Corruption on Panand Road)

पाणंद रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी पंचायत समिती समोरचं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. भंडाऱ्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निलज खुर्द गावात मातोश्री पाणंद रस्त्याचं काम करण्यात आलं. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याची तक्रार दिल्यानंतरही थातूरमातूर चौकशी करून दोषींना अभय दिल्या जात असल्याचा आरोप करीत निलज खुर्द ग्रामवासियांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. दिलेल्या इशारानुसार निलज खुर्दचे ग्रामवासीय मोहाडी पंचायत समिती समोर आले. यावेळी त्यांनी सोबत आणलेलं ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना समयसुचकतेनं ताब्यात घेतलं आणि मोठा अनर्थ टळला. यामुळे मोहाडी पंचायत समिती प्रशासनात चांगलीच तारांबळ उडाली आहे.

आणखी वाचा