Chandrashekhar Bawankule: बुलढाणा जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यात (Buldhana) अवैध वाळू उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए अर्थात महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेय. महसूल मंत्री बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी महसूल विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

Continues below advertisement

मंत्री, खासदार, आमदारांच्या सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करु नका

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निगराणी ठेवून दोषींवर कारवाई करावी, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करतांना मंत्री, खासदार, आमदारांच्या सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करु नका आणि वाळू माफियांना सोडू नका, असे ही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यात यापुढे अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी बंद झाल्यास त्याला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जबाबदार निश्चित राहतील, असा इशाराही महसूल मंत्र्यांनी यावेळी दिला.

....तर अशांच्या मुसक्या आवळणे सहज शक्य- चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाने ठरवले तर अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणारे आणि त्यात सामील असणाऱ्यांचा मुसक्या आवळणे सहज शक्य आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात तशी कारवाई सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला अधिकार दिल्याने त्यांनीही कारवाई करावी. त्यात कुणाचा हस्तक्षेप होता कामा नये, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या: