चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर राजेंद्र डोंगे यांची निवड कण्यात आली आहे. त्यामुळे, येथील बाजार समितीवर असेलली शिवसेना उबाठा गटाची सत्ता उलथावून भाजपने (BJP) बाजार समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. शिवसेना उबाठा गटाचे 11 तर काँग्रेसच्या 2 संचालकांनी कालच भाजपात प्रवेश केला होता, या प्रवेशानंतर चंद्रपूर (Chandrapur) भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता भाजपचे कमळ फुलले आहे. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भास्कर ताजणे यांच्याविुद्ध काही दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्ताव आला होता आणि त्यानंतर भास्कर ताजणे यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप यावेळी ताजणेंनी केला होता.

ताजनेंच्या राजीनाम्यानंतर झालेल्या बाजार समितीसाठी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड कण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची एक हाती सत्ता स्थापित झाली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना ठाकरे गटात असलेल्या 11 सदस्यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर काँग्रेसच्या 2 सदस्यांनीही काँग्रेसची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे, येथील बाजार समितीवर भाजपच्या सभापतीपदाचा मार्ग अतिशय सुकर झाला.

आपल्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल या भीतीने माजी सभापती भास्कर ताजने यांनी आधीच राजीनामा दिला होता, हे विशेष. कोणत्याही पक्षात प्रवेश घेण्यासंदर्भात कोणत्याही संचालकांवर अथवा सभापतीवर दबाव नव्हता. किंबहुना हा विषयच कधी कुणामार्फत बोलल्या गेला नाही. भास्कर ताजने यांनी सदर विषयाला घेऊन भाजपात प्रवेश घेण्यास नकार दिल्याने अविश्वास ठराव आणला असल्याचे म्हटले होत. मात्र, स्वतःवरील दोषावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे. सदर अविश्वास कुणाच्या सांगण्यावरून झाला नसन सर्व संचालकांच्या एकमताने पारित झाला आहे. त्यावेळी राजकीय पक्ष, गट आदी न बघता केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीकरिता हा निर्णय घेण्यात आला. ताजने यांच्या बाजूने एकही संचालक नाही, यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी उघड होते, अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन उताणे यांनी दिली होती.

ताजनेंच्या कारभारावर नाराजी - डोंगे

मी बांधकाम सभापती असन सुद्धा या अविश्वास प्रस्तावात सहभागी आह, यात कोणताही पक्षपात नाही. ताजने यांच्या कारभारावरील नाराजीमुळेच सदर अविश्वास प्रस्ताव आणला. पुढील सभापतीची निवड रीतसर सर्व संचालक एकत्र बसून निर्णय घेऊ, असे राज डोंगे यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यानंतर, आज राजेंद्र डोंगे यांचीच निवड बाजार समितीच्या सभापतीपदावर झाली आहे.

हेही वाचा

राज ठाकरे सपत्नीक 'वर्षा' बंगल्यावर, बाप्पांचे दर्शन; मुख्यमंत्र्यांसोबत 15 दिवसांत तिसरी भेट