Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प (Tadoba-Andhari Tiger Reserve) म्हणजे वाघांचं नंदनवन. मात्र याच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या व्याघ्रप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यामुळे तीन महिने बंद असलेली ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील टायगर सफारी एक ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. मात्र आता नवीन सफारीसाठी जास्तीचे पैसे मोजावे (Tadoba Tiger Safari Fee Hike) लागणार असून ताडोबा प्रशासनाने टायगर सफारीच्या दरात मोठी वाढ केली आहे. म्हणजेच कोर झोनमध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी भेट देणाऱ्या पर्यटकाला 12,800 रुपये मोजावे लागणार आहे तर हेच जुने दर आधी 11 हजार 800 इतके होते. म्हणजे जवळ जवळ एक हजार रुपयांची दरवाढ यात करण्यात आली आहे.
दुसरीकडे याच दरवाढीच्या मुद्यावरून काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आक्रमक झाल्या आहेत. नवीन शुल्कवाढ तातडीने वापस घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील खासदार धानोरकर यांनी दिला आहे.
सध्याचे प्रवेश शुल्क (प्रति जिप्सी, एक वेळ)
झोन दिवस एकूण शुल्क
कोर सोमवार - शुक्रवार रु. 8,800 (जुने दर 7,800)
कोर शनिवार - रविवार रु. 12,800 (जुने दर11,800)
बफर सोमवार - शुक्रवार रु. 6,000 (जुने दर 5000)
बफर शनिवार - रविवार रु. 7000 (जुने दर 6000)
...अन्यथा व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व प्रवेशद्वारांवर आंदोलन करू- प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar on Tadoba Tiger Safari Fee Hike)
ताडोबा प्रशासनाने जिप्सी शुल्क, प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क या तिन्हींमध्ये वाढ केल्याने आता ताडोबाची सफारी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाली आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवीन शुल्क वाढ तातडीने वापस घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. खासदारांच्या मते ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा सर्वसामान्य लोकांना देखील पाहता यावा, हा फक्त श्रीमंत लोकांच्या आवाक्यात राहू नये, यासाठी जुने दर कायम ठेवावे. जुने दर कायम न ठेवल्यास धानोरकर यांनी 1 ऑक्टोबरला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व प्रवेशद्वारांवर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Dharashiv Rain Farmers: निर्लज्जपणाचा कळस! शेतकऱ्यांची घरदारं पाण्यात बुडालेली असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न, VIDEO व्हायरल
- पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नाहीत; सर्वोच्च न्यायालय कोणता फैसला देणार? न्यायमूर्ती म्हणाले होते, AI आधारित पाळत असावी