Chhatrapati Sambhajinagar News :  शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बोलावलेल्या पक्षाच्या मेळाव्याला माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी दांडी मारल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे याच मुद्यावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचं हाडवैर पुन्हा समोर आल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच स्वत: खैरे यांनी आपल्या गैरहजेरीवार भाष्य करत खळबळजनक आरोप केले आहे.  यावेळी बोलताना अंबादास दानवेंच्या मेळ्याव्यावरून चंद्रकांत खैरेंच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे ही पाहायला मिळाले आहे. मेळाव्याबाबत अंबादास दानवेने( Ambadas Danve) मला काहीही सांगितलं नाही, याबाबत मी उद्धव साहेबाना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतोय, असा घाणाघात चंद्रकांत खैरेंनी यावेळी केला आहे. 

 कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही- चंद्रकांत खैरे

पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की,  कालच्या  पक्षाचा कार्यक्रम बाबत मला कुणी सांगितलं नव्हतं, मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचं होतं. मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नव्हते, मला विचारायला हवे होतं. मला डावलून कसे चालेल? आज उद्धवजी संकटात आहे. त्यामुळे एकत्र येऊन काम करावे लागेल. मात्र कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही. मी मरेल पण पक्ष सोडणार नाही. असे असताना अंबादास दानवेने मला सांगितलं नाही, याबाबत मी उद्धव साहेबाना सांगणार आहे, तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतोय. शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतोय, असही चंद्रकांत खैरे म्हणाले.

या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले- चंद्रकांत खैरे

तो मला बोलतच नाही, मी माझं आंदोलन करणार, तो करेल नाही तर नाही करेल. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे कुठे जातात, कोण कसे अडजसेंट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वता: कार्यक्रमसाठी छोट्या-मोठ्यांना फोन करतो, पक्ष मोठा करायचा दिलं सोडून आणि गटबाजी करताय, मी अजूनही काम करतोय. अनेक लोक सोडून चालले आहे, हे बरं नाही.आम्ही एकत्र येत मदत करायला हवी, असेही माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. पक्ष चालवायचा असेल तर आपण एकत्र पाहिजे. या माणसांमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटले, या माणसाने काय केलं सांगा. अनेक लोक सोडून जाताय असेही ते म्हणाले.

हे ही वाचा