मुंबई : CAT-2019 परीक्षेचा निकाल IIM- कोझिकोडी इन्स्टिट्यूटकडून आज जाहीर करण्यात आला. देशात 10 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले असून यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबईतील 2 विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट) बाजी मारली असून सोमांश चोरडिया आणि राहुल मांगलिक अशी त्यांची नावे आहेत. त्यांना 100 पर्सेन्टाइल आणि 99.99 पर्सेन्टाइल गुण आहेत. हे दोघेही आयआयटी बॉम्बे, पवईचे विद्यार्थी आहेत.
24 नोव्हेंबर 2019 रोजी देशभरातून 2 लाख 9 हजार 926 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश मिळविणारा सोमांश आयआयटी बॉम्बेच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिकत असून मूळचा नागपूरचा आहे तर राहुल हा मूळचा दिल्लीचा असून आयआयटी बॉम्बे येथे राहत आहे.
100 पर्सेन्टाइल मिळालेल्या सोमांशला भविष्यात आयआयएम अहमदाबादला जाण्याची इच्छा असून स्वतःचे स्टार्टअप सुरु करायचे आहे. देशातील टॉप आयआयएम कॉलेजमध्ये, एमबीएम कॉलेजमध्ये देशभरातून कॅट परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी वर्षभर करत असतात. त्यामुळे या निकालाची अनेकांना प्रतीक्षा असते.
99.99 पर्सेन्टाइल असणाऱ्या राहुलने परीक्षेसाठी आपण कोचिंग क्लास लावला आणि मॉक टेस्टद्वारे त्यावर खूप मेहनत घेतली असल्याचे संगितले. राहुलला सुद्धा टॉप आयआयएम मधून एमबीए करण्याचा मानस आहे. 24 नोव्हेंबरला दोन शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या कॅटच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक संख्या होती. यामध्ये 75 हजार 4 विद्यार्थिनी तर 1 लाख 34 हजार 917 विद्यार्थ्यांचा समावेश होता. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्याही 5 होती. 100 पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या 4 विद्यार्थ्यांचा तर इतर 6 विद्यार्थ्यांमध्ये झारखंड , कर्नाटक , तामिळनाडू, तेलंगणा , उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॅट 2019च्या या परीक्षेत 99.99 पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या 21 असून यातील 19विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आहेत.
24 नोव्हेंबरला दोन शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या कॅटच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक संख्या होती. यामध्ये 75 हजार 4 विद्यार्थिनी तर 1 लाख 34 हजार 917 विद्यार्थ्यांचा समावेश होता. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्याही 5 होती. 100 पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या 4 विद्यार्थ्यांचा तर इतर 6 विद्यार्थ्यांमध्ये झारखंड , कर्नाटक , तामिळनाडू, तेलंगणा , उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॅट 2019 च्या या परीक्षेत 99.99 पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या 21 असून यातील 19 विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आहेत.