Shrikant Shinde : यांच्याकडून काहीही चांगलं होऊ शकत नाही, एवढी आगपाखड कशासाठी? श्रीकांत शिंदेंचा पहिल्यांदाच राज ठाकरेंवर वार
Shrikant Shinde On Raj Thackeray : गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

बुलढाणा : राज्यातील गडकिल्ल्यांवरील नमो केंद्रावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर टीका केली आहे. हे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट टीका केली आहे.
राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून पर्यटकांना माहिती आणि सुविधा देण्यात येणार आहे. मात्र शिवरायांच्या किल्ल्यांवर मोदींच्या नावाने केंद्र उभारण्याला राज ठाकरेंनी विरोध केला आहे. हे केंद्र फोडून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्याचवरून आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
Shrikant Shinde On Raj Thackeray : एवढी आगपाखड कशासाठी?
राज ठाकरे यांच्यावर टीका करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात, कारण त्यांच्याकडून काहीही चांगलं झालं नाही. हे लोक काही निर्माण करू शकत नाहीत, त्यामुळे हे तोडफोडीचीच भाषा करणार. एवढी आगपाखड करण्याची गरज काय? गडकिल्ल्यावर पर्यटकांना माहिती मिळण्यासाठी ते केंद्र सुरू करण्यात येत आहे. गडकिल्ल्यांचं किंवा मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम महायुतीने केलं. त्यामुळे नरेंद्र मोदींचे कौतुक करण्याऐवजी ते फोडण्याची भाषा करतात. मात्र कधीकाळी यांनीही नरेंद्र मोदींचे कौतुक केलं होतं."
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : ठाकरेंवर लोकांचा विश्वास उरला नाही
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "लोकांना कोण खरं कोण खोटं, कोण देणार आहे, कोण घेणार आहे... हे सगळं माहीत असतं. आता अतिवृष्टी झाली त्यावेळेस महायुती सरकारने 38 हजार कोटीचं पॅकेज दिलं. ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना भेटायला गेले तर त्यांनी काही ना काही सोबत नेलं होतं. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही. त्यामुळे आता शेतकरी यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत आहेत. आता ते दौरे करत आहेत, निवडणुकीपूर्वी काहीतरी आश्वासने देतील. मात्र लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिला नाही."
Shrikant Shinde On Election : युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसदर्भात बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "आम्ही लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे प्रयत्न महायुतीचा असेल, मात्र ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना असतील त्या ठिकाणी वरिष्ठ निर्णय घेतील."
ही बातमी वाचा:

















