Sanjay Gaikwad: आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा प्रकरणी संजय गायकवाड पुन्हा संतापले; म्हणाले, फूड अँड ड्रगचे हxxxx अधिकारी...
Sanjay Gaikwad: तुम्हाला कळेल की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना कोणती भाषा समजते. यातून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आमदार संजय गायकवाड यांनी एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

बुलढाणा: आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण मिळाल्याने शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेला राडा संपूर्ण राज्याने बघितला. मात्र बुलढाण्यातही आता संजय गायकवाड पुन्हा एकदा संतापले आहेत. बुलढाण्यातील पैनगंगा आश्रम शाळेतील 19 विद्यार्थिनींना परवा भात आणि कढीतून विषबाधा झाली होती. आता यावर तुम्ही काय कारवाई करणार...? या प्रश्नावर आमदार संजय गायकवाड चांगले संतापले ते म्हणाले की, हरामखोर फूड अँड ड्रगचे अधिकारी माझा फोन घेत नाहीत, मी आत्ताच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र हे लोक लोकांच्या जीवाशी खेळतात. यापुढे आता तुम्हाला कळेल की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना कोणती भाषा समजते. यातून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आमदार संजय गायकवाड यांनी एक प्रकारचा इशाराच दिला आहे.
संस्थाचालकांनी ही हरामखोरी का करावी
आमदार संजय गायकवाड याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले, हि घटना मला काल समजली. 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे, त्यातील 6 विद्यार्थी आदीवासी पाड्यामध्ये आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत, ही फार गंभीर बाब आहे. फूड अँण्ड ड्रगचे हरामखोर अधिकारी फोन उचलत नाहीत,तिकडे गेले सुध्दा नाहीत. त्यांना विद्यार्थ्यांची काळजी नाही. संस्थाचालक या लेकरांच्या तोंडचा घास हिसकावतो. त्यांना दुध देत नाही, अंडी देत नाही, त्याठिकाणी वरण म्हणून पाणी देतात, यासाठी किती वेळा मोर्चा काढला. त्यांना उपाशी मारलं जातं. मग आदीवासी शाळा निर्माण कशासाठी केला. आदीवासी भागात त्यांना खायला मिळत नाही. त्यामुळे त्यांना शाळा निर्माण केल्या त्यांना 75 लाखांचे पैसे विद्यार्थ्यांनुसार अनुदान मिळतं. मग या संस्थाचालकांनी ही हरामखोरी का करावी, त्यांच्या तोंडचा घास का हिसकावून घेता, असा सवाल देखील संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला
बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील (Painganga Adivasi Ashram Shala) 13 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच विद्यार्थिनी गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. रात्रीच्या जेवणातील कढी भात खाल्यानंतर विद्यार्थिनींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांची आहे. बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना रात्री कडी आणि भात खाल्ल्याने विषबाधा झाली. अचानक मुलींना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरु झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.




















