Buldhana News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात हे जग प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील  पुरातन श्री कमळजा माता मंदिरात पोहोचल्याचे पाहायला मिळालं. वशेष म्हणजे छातीएवढ्या पाण्यातून वाट काढत आमदार खरात तिथे पोहोचले. मंदिरात आमदार सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नेतृत्व करण्यासाठी त्यांनी कमळजा मातेच्या चरणी विशेष प्रार्थना केली. 

Continues below advertisement

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर-लोणार मतदारसंघात समाजोपयोगी उपक्रमांसह श्रद्धेचे अनोखे दर्शन घडले. लोणार सरोवरात छातीएवढे पाणी साचलेले असतानाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी धाडसाने पाण्यातून मार्ग काढत कमळजा माता मंदिर गाठले.  कमळजा मातेच्या चरणी विशेष प्रार्थना केली. कमळजा मातेची विधिवत आरती करून आशीर्वाद घेतले. प्रतिकूल परिस्थितीतही श्रद्धा आणि निष्ठा जपत त्यांनी आपल्या नेत्याप्रति केलेल्या या कृतीची परिसरात मोठी चर्चा सुरु आहे. 

शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, देशभरातून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते, खासदा, आमदारही त्यांना सोशल मीडियातून, फोन करुन आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहेत. विशेष म्हणजे, मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदाचा उद्धव ठाकरेंना वाढदिवसा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कारण, गेल्याच महिन्यात ठाकरेंच्या 6 खासदारांनी त्यांनी साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापैकी, दोन खासदारांनी आज वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. मात्र, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी वाढदिवसाची पोस्ट डिलिट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Continues below advertisement

खासदार ओमराजेंनी दिल्या शुभेच्छा

उद्धव ठाकरेंसह आज शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही वाढदिवस आहे. त्यामुळे, फुटलेल्या खासदारांकडून त्यांनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही रामदास कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, नेटीझन्सने कमेंट करुन त्यांना उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट का केली नाही, असा सवाल केला. त्यानंतर, ओमराजेंकडून उद्धव ठाकरेंनाही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी केवळ ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या या खासदारांच्या शुभेच्छांमुळे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणखी चर्चेत आला.