एक्स्प्लोर

Buldhana News : केस गळती, नख गळतीनंतर आता बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा प्रकार? आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी चालू वर्षात अचानकपणे केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे अशा गूढ आजारांचा अनुभव घेतला आहे

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी चालू वर्षात अचानकपणे केस गळणे, टक्कल पडणे आणि बोटांची नखे गळून जाणे अशा गूढ आजारांचा अनुभव घेतला आहे. खामगाव व शेगाव तालुक्यांमध्ये सुरू झालेला हा आजार आता चिखली व मेहकरसारख्या घाटमाथ्याच्या भागातही पसरला आहे. या प्रकारांना अनेक महिने उलटले असतानाही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल अजूनही लालफीतशाहीत अडकलेला आहे. त्यातच आता मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख गावातील 20 गावकऱ्यांनी हाताला खोल भेगा पडत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे नोंदवल्या आहेत.

हा प्रकार केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह मतदारसंघातील गावात उघडकीस आल्याने आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे विशेष पथक शेलगाव देशमुख येथे दाखल झाले. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने गावातील बाधित नागरिकांची सखोल वैद्यकीय तपासणी केली.

नेमका आजार कोणता आहे?

पथकाने केलेल्या तपासणीत एकूण 20 रुग्णांची पाहणी करण्यात आली. यातील बहुतांश रुग्णांना इसबगोल (एक्झेमा, पाल्मोप्लांटर केराटोडर्मा किंवा पाल्मोप्लांटर सोरायसिस) या त्वचाविकाराचे लक्षणे आढळून आली आहेत. हे रुग्ण मागील 12 महिने ते 5 वर्षांपासून या आजाराने त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांवर मागील 1 ते 2 वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याचेही तपासणीतून निष्पन्न झाले आहे. हा आजार संसर्गजन्य नसून पाण्याशी याचा काहीही संबंध नाही, वेगवेगळ्या प्रतिजन किंवा हानिकारक रसायनांच्या संपर्कात आल्यास, शरीराच्या स्वयंप्रतिकारक प्रणालीद्वारे (Autoimmune response) हा विकार उद्भवतो. तसेच, सर्व रुग्णांना आणि स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांना या आजाराची माहिती, योग्य उपचार पद्धती व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. केस गळतीनंतर रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली होती. अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. त्यानंतर रुग्णांना प्रचंड थकवा व चिडखोरपणा जाणवू लागला होता. या सर्व प्रकारानंतर आयसीएमआरच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. मात्र याबाबतचा अहवाल अजूनही लालफीतशाहीत अडकलेला आहे. 

आणखी वाचा 

Pune Bridge Collapse : इंद्रायणीवरील कुंडमळा पूल कोसळण्याला जबाबदार कोण? कुणाची काय जबाबदारी? महाराष्ट्राला पडलेले प्रश्न

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?

व्हिडीओ

Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
Thane Mayor: शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
शिंदे मुंबईमध्ये हटून बसल्याची चर्चा पण आता ठाण्यामध्ये भाजपला काय काय हवं याची यादी समोर आली!
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
पिंपरी चिंचवडकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 132 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एकाच क्लिकवर
Embed widget