एक्स्प्लोर

Buldhana News: पहिले केस गळती, मग नख गळती अन् आता...; बुलढाण्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण, नेमकं काय घडतंय?

Buldhana News: बुलढाण्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण, नेमकं काय घडतंय?

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकांना टक्कल पडलं होतं. त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर याच रुग्णांचे नख विदृप होऊन नखं गळण्याचे प्रमाणही वाढलं होतं. आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. ज्या केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुना सेलेनियमचे प्रमाण वाढलं होतं अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात आयसीएमआरच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. मात्र चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही त्यानंतर नखं गळती सुरू झाली व नखं गळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. मात्र काही दिवसातच या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

बुलढाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण-

गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. केस गळतीनंतर रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली होती. अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. त्यानंतर आता रुग्णांना प्रचंड थकवा व चिडखोरपणा जाणवू लागल्याने बुलढाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नक्की कुठला आजार? नागरिक साशंक

गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. ICMR चे पथक आले. अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतल्या गेलेत. मात्र, औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अद्यापही ICMR चा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमक काय लपवू पाहत आहे? यावर नागरिकांना शंका येत आहे. या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे? या बद्दल नागरिक साशंक आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

माझा इम्पॅक्ट : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती झालेल्या रुग्णांच्या नखं गळती प्रकरण; केंद्र सरकारकडून दखल, उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणूक

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
Embed widget