Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad school) शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आलीय. चक्क शाळेचे मुख्याध्यापक हेच दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणा घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आलंय. धम्मसागर कांबळे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते. यावेळी प्रार्थना सुद्धा सुरू होती. या संदर्भातील काही व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. तर स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी केलीय. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Buldhana News : Abp माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, जिल्हा प्रशासनाकडून आता कारणे दाखवा नोटीस
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळातील विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची बातमी Abp माझाने दाखवली होती. याच बातमीची दाखल आता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार चक्क रद्दी पेपरवर दिला जात होता. सोबतच पोषण आहार सेवन करताना विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती भटके श्वान देखील आढळून आले होते. या घटनेचे व्हिडीओ पुढे आल्यांनतर सर्वत्र खळबळ उडाली होती. परिणामी बावनबीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाला जिल्हा प्रशासनाकडून आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी तीन दिवसात लेखी अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी आदेश दिले आहेत.
Buldhana News : नियमावली धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
खर तर या चिमुकल्यांना पोषण आहार देण्यासाठी प्रत्येक शाळेला शासनाने स्टीलच्या प्लेट उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र स्टीलच्या प्लेटमध्ये पोषण आहार न देता रद्दी पेपरवर पोषण आहार दिल्या जात असल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर मुलं पोषण आहार खाताना त्यांच्या अवतीभवती श्र्वानांचा मुक्त संचारही दिसत आहे. मुख्याध्यापक आणि कर्मचारी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसं खेळतायेत हे या धक्कादायक घटनेतून समोर आलंय.
महत्वाच्या बातम्या: