Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम अशा संग्रामपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बैठकीच्या नावाखाली कार्यालयात चक्क पार्टी सुरु असल्याचा धक्कादायक आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे कार्यालयीन कामासाठी आलेले आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी व वृद्ध महिलांवर मात्र दिवसभर ताठकळत राहण्याची वेळ आली आहे. सकाळी अकरा वाजेपासून आलेले शेतकऱ्यांना बैठक सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र दिवसभर बैठकीच्या नावाखाली एकाही शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकारी न भेटल्याने संतप्त शेतकरी घरी निघून गेले. या प्रकारामुळे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे
8 वर्ष लेकरासारखं जपलेल्या उभ्या सिताफळ बागेवर जेसीबी फिरवण्याची वेळ
सिताफळला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आणि कीड रोगासह फळवाढी दरम्यान कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत नसल्याने येवती गावात एकाच दिवशी 3 शेतकऱ्याने उभ्या सिताफळ बागेवर जेसीबी फिरवत सिताफळ बाग उपटून टाकल्याची घटना घडलीय. वाशिम जिल्ह्यात येवती गावातील शेतकऱ्याने काल एकाच दिवशी हे कृत्य केलं आहे. यात रामचंद्र गवळी यांनी आपल्या शेतातील 4 एकर, विजय बळीराम शिंदे तीन एकर तर विजय प्रल्हाद शिंदे यांनी 2 एकर सिताफळ बागेवर जेसीबी फिरवलाय.
ना उत्पन्न, ना भाव, ना बाजारपेठ
दरम्यान, सिताफळबागेवर 8 वर्ष लेकरासारखं जपलेल्या बागेवर जेसीबी फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. क्रॉसिंगच्या नावाखाली मार्केटिंग करून कोट्यावधी रुपये कमावून देऊ, निसर्ग आणि व्यवस्था यात आधीच भरडलेल्या कास्तकाराच्या मस्तकी कमी दर्जा देणारी सिताफळ प्रजाती दिल्याने हि वेळ बळीराज्यावर आल्याचे शेतकरी सांगताय. तसेच ना उत्पन्न, ना भाव, ना बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आणि कृषी विभागाच्या बाबू शाही धोरणामुळे आणि सातत्याने बदलत्या वातावरण कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने उभ्या बागेवर जेसीबी फिरवल्याचेही शेतकरी सांगतात.
वर्ध्याच्या देवळी येथे उमेदवाराचा ट्रॅक्टरवरून प्रचार
देवळी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि देवळी जनशक्ती पक्ष अशी तिहेरी लढत पहायला मिळते आहे. येथे विविध सामाजिक व शेतकरी संघटना मिळून देवळी जनशक्ती आघाडी तयार करण्यात आली. शेतकरी नेते किरण ठाकरे हे जनशक्ती आघाडीकडून नागराध्यक्ष पदासाठी रिंगणात तर भाजपकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस आणि काँग्रेसकडून सुरेश वैद्य रिंगणात आहे. येथे शहरात करण्यात आलेल्या विविध कामाच्या चुकावर बोट ठेवले जात असतानाच प्रचाराचा जोर वाढलाय. जनशक्ती आघाडीच्या उमेदवाराने ट्रॅक्टरवर शहरात फिरून प्रचार सुरू केलाय. तर भाजपकडून देखील रॅली, कॉर्नर मिटिंग केल्या जात आहे. देवळी जनशक्ती आघाडीची प्रचारातील आघाडी नेमके कुणाचे गणित बिघडवते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेय.
ही बातमी वाचा: