Chandrapur : आपल्या व्यवसायासाठी डिजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेल्या डिजे वादक पंकज बागडे यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसाननगर येथे बोलेरो ची उभ्या ट्रक ला धडक दिली. धडक इतकी भिषण होती की अपघातानंतर 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी आहे. गडचिरोली येथील प्रसिद्ध डिजे वादक पंकज बागडे यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
गडचिरोली येथील डिजे संघटनेचे पंकज बागडे हे अध्यक्ष होते. डिजे व्यवसायासाठी काही साहित्य खरेदी करण्यासाठी काल ते सहकाऱ्यांसोबत ते चंद्रपुरात आले होते. खरेदीनंतर रात्री परत जातांना सावली तालुक्यातील किसाननगर येथे रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचविताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक जोरदार धडक दिली. या धडकेत चौघांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये पंकज बागडे (वय 26 रा. गडचिरोली), अनुप ताडूलवार (वय 35 वर्ष रा.विहीरगाव ता.सावली) महेश्वरी ताडूलवार (वय 24 वर्ष रा. विहीरगाव) आणि मनोज तीर्थगिरीवार (वय 29 रा.ताडगाव ता.भामरागड जि. गडचिरोली) यांचा समावेश तर सुरेंद्र मसराम (वय 23 वर्ष रा. चिखली ता. सावली) गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Chandrashekhar Bawankule : ऑटोचालक, झेडपी सदस्य, आमदार ते ऊर्जामंत्री, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष
Chandrapur Crime : वाघनखांची विक्रीसाठी आलेल्या आरोपीला बेड्या
चंद्रपूर : जंगलभागात एकीकडे शिकाऱ्यांचा बोलबाला आहे. तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय आहेत. याअंतर्गत वाघनखांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. तस्कर टोळीतील एक व्यक्ती शहरातील एका बारमध्ये वाघनखांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची टीप अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करुन चिमूर वनविभागाने सापळा रचला. तसेच बारमध्ये येताच जसबीरसिंग अंधेरेले याला अटक केली. आरोपी हा चिमूर तालुक्यातील केसलापूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच्या चौकशीतून वाघांच्या शिकारींची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपीच्या अटकेनंतर परिसरातील तस्कर अलर्ट झाले असून काही भूमिगत होण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. तसेच चौकशीत आरोपीने आपली नावे घेतल्यास आपण अचडणीत अडकू शकतो अशी भिती तस्करांमध्ये आहे.