एक्स्प्लोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता मंत्री अशोक उईकेंचा फोटो मनसेच्या बॅनरवर; हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात भाजपातूनही विरोध?

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो मनसेच्या बॅनरवर झळकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Maharashtra Politics मुंबई : राज्यात पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा शासन निर्णयाला कडाडून विरोध होताना दिसतोय. दरम्यान याच हिंदी सक्तीच्या (Marathi Vs Hindi) मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला, त्रिभाषा सूत्राला ठाकरे बंधूंनी विरोध केला असून येत्या 5 जुलै रोजी या निर्णयाच्या विरोधात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने 2006 नंतर दोन्ही ठाकरेंची एकत्रित ताकद दिसणार आहे. अशातच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मंत्री अशोक उईके (Ashok Uike) यांनी केलेल्या वक्तव्य चक्क मनसेच्या बॅनरवर झळलेलं बघायला मिळत आहे. 

मनसेच्या बॅनरवर आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो 

दरम्यान, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला, त्रिभाषा सूत्राला ठाकरे बंधूंनी विरोध केला असून 5 जुलै रोजी या निर्णयाच्या विरोधात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने 2006 नंतर दोन्ही ठाकरेंची एकत्रित ताकद दिसणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो मनसेच्या बॅनरवर झळकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 5 जुलैला मनसेकडून तृतीय भाषा हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चाच आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. त्यातच शनिवारी मनसेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो असल्याने चर्चा रंगल्या होत्या. तर आता भाजपचे आमदार मंत्री अशोक उईके यांचा फोटो आणि मत मनसेच्या पोस्टरवर बघायला मिळत आहे.

नेमकं काय म्हणाले मंत्री अशोक उईके?  

हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही. मी फक्त मराठीत बोलणार, माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अडाणी आहे. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत. मी तेच बोलणार आहे... - आदीवासी मंत्री (भाजपा), असा आशय या बॅनरवर लिहण्यात आला असून आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो ही त्यावर दिसतो आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादर शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी 

'हिंदीसक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया !’ अशा आशयाचे बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादर येथील शिवसेना भवन परिसरात लावण्यात आले आहे. आमदार महेश सावंत यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आज दुपारी तीन वाजता ठाकरे गटाकडून आणि विरोधी पक्षाकडून तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राकडून तृतीय भाषेच्या सरकारच्या शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे. त्यामुळे यावेळी मोठा जमाव जमणार असल्याचे बोललं जात आहे. 

हे ही वाचा 

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Embed widget