एक्स्प्लोर

Bihar Elections 2025: लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहारच्या राजकीय आखाड्यात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंच्या पोस्टने चर्चांना उधाण

Bihar Elections 2025 : बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 2025च्या विधानसभा निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा आहे. भाजप नेत्यांशी भेट घेतल्यामुळे ही चर्चा होत आहे.

Bihar Election 2025: देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर (Maithili Thakur) 2025च्या विधानसभा निवडणुकीत (Bihar Elections 2025) उतरू शकतात, अशी चर्चा आहे. भाजप नेत्यांशी भेट घेतल्यामुळे ही चर्चा होत आहे. या भेटीदरम्यान तिचे वडीलही उपस्थित होते. विनोद तावडे (Vinod Tawde) आणि नित्यानंद राय (Nityanand Rai) यांच्यासोबतचा तिचा फोटो समोर आल्यानंतर, तिच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.

 भाजपच्या विनोद तावडेंच्या पोस्टने चर्चांना उधाण (Vinod Tawde Instagram post on Maithili Thakur)

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी गेल्या रविवारी (5 ऑक्टोबर 2025) त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून फोटो शेअर केले आणि लिहिले, "1995 मध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यावर बिहार सोडून गेलेल्या कुटुंबातील मुलगी, प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, बिहारची बदलती गती पाहून बिहारला परत येऊ इच्छिते. आज गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी त्यांना आग्रह केला की बिहारचा सामान्य माणूस तिच्याकडून बिहारच्या लोकांसाठी आणि त्याच्या विकासासाठी योगदान देण्याची अपेक्षा करतो आणि तिने त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. बिहारची कन्या मैथिली ठाकूर यांना शुभेच्छा!"

विनोद तावडे यांच्या पोस्टवरून असे सूचित होते की, मैथिली निवडणूक लढवू शकते. मैथिली ठाकूर यांनी X वर देखील पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, "बिहारसाठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांशी होणारा प्रत्येक संवाद मला दूरदृष्टी आणि सेवेच्या शक्तीची आठवण करून देतो. नित्यानंद रायजी आणि विनोद तावडेजी यांचे मनापासून कौतुक आणि आभार."

कोण आहे मैथिली ठाकूर? (Who is Maithili Thakur?)

मैथिली ठाकूर ही बेनीपट्टी, मधुबनी येथील रहिवासी आहे. या वर्षी जुलैमध्ये (2025) ती 25 वर्षांची झाली. निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूरची बिहारची "स्टेट आयकॉन" म्हणूनही नियुक्ती केली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या मैथिली ठाकूरची बिहारच्या लोकसंगीतातील योगदानाबद्दल 2021च्या संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी निवड झाली.

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात जन्मलेल्या मैथिली ठाकूरने तिच्या दोन भावांसह तिच्या आजोबा आणि वडिलांकडून लोक आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, हार्मोनियम आणि तबल्याचे प्रशिक्षण घेतले आहे. मैथिली ठाकूरने मैथिली, भोजपुरी आणि हिंदीमध्ये बिहारची पारंपारिक लोकगीते गायली आहेत. तिने इंडियन आयडल आणि सा रे गा मा यासह अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तिचे एक YouTube चॅनेल देखील आहे आणि तिच्या दोन्ही भावांचे चॅनेल देखील आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Nida Khan Nashik TCS Case: नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचे Defined Role...; राष्ट्रीय महिला आयोगाचा हादरवणारा अहवाल
नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचे Defined Role...; राष्ट्रीय महिला आयोगाचा हादरवणारा अहवाल
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Tamil Nadu CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव; मलेशियाच्या पंतप्रधानांची खास पोस्ट, तमिळमध्ये म्हणाले, 'एक बोटाची...
थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव; मलेशियाच्या पंतप्रधानांची खास पोस्ट, तमिळमध्ये म्हणाले, 'एक बोटाची क्रांती'

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Embed widget