Nana Patole on PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल त्यांच्या भाषणांमधून भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. यावर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आवाहन केलं आहे. याबाबत नाना पटोले यांनी मोदींना पत्र लिहून हे आवाहन केलं आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करताना चार्टर्ड विमानांचा वापर करु नये, दौऱ्यांमध्ये मोठ्या वाहन ताफ्यांचा वापर करु नये, परदेशी दौरे टाळावे, मेट्रो सारख्या ट्रेनचा सर्व मंत्र्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भविष्यातील स्वीडन, नॉर्वे, इटली या विदेश दौरे टाळावे
नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भविष्यातील स्वीडन, नॉर्वे, इटली या विदेश दौऱ्यांसह तेलंगणा बंगळुरु, जामनगर या दौऱ्यांनाही कात्री लावावी आणि हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसह त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आणि स्वतः त्यांनी त्यांच्या पक्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्याच आवाहन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
आर्थिक भार कमी करण्यासाठी इंधनाचा गरजेनुसार वापर करण्याचं आवाहन
इंधनाची बचत हा भार कमी करु शकते. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतील आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे वाढणाऱ्या किमतींचा सामना करण्यासाठी देशाला मदत करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सामूहिक सहभागाचे आवाहन केले आहे. त्यामुळे, देशावरील सध्याचा आणि भविष्यातील आर्थिक भार कमी करण्यासाठी त्यांनी पेट्रोलियम उत्पादनांचा गरजेनुसार वापर आणि अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. संघर्ष सुरू झाल्यानंतर 70 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी, या जागतिक अस्थिरतेच्या काळात पेट्रोलियमच्या किमती स्थिर राहिलेल्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज