एक्स्प्लोर

Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं

Bhandara News: दुष्काळाच्या भीषण चक्रात अडकलेल्या आणि हताश झालेल्या एका शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना भंडाऱ्यात घडली आहे.

Bhandara News: दुष्काळाच्या (Drought) भीषण चक्रात अडकलेल्या आणि हताश झालेल्या एका शेतकऱ्याने (Farmer) स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना भंडाऱ्यात (Bhandara News) घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी (Mohadi) तालुक्यातील धोप येथील ही घटना असून राजेंद्र सपाटे (वय 53 वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर फोडला होता टाहो

विशेष म्हणजे, शनिवारी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) यांनी मोहाडी आणि तुमसर (Tumsar) तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीचा पाहणी दौरा केला होता. या पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती अत्यंत अश्रूढालून कथन केली होती.

तलावासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामुळे त्यांच्या शेतातील सिंचनाची (Irrigation) व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यासंदर्भात वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे चकरा मारल्या, निवेदने दिली; मात्र अधिकाऱ्यांनी निवेदने आणि फाइल्स फेकून दिल्याची गंभीर तक्रार त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली होती.

Bhandara News: अखेर हताश होऊन उचलले टोकाचे पाऊल

प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने आणि शेतातील उध्वस्त झालेली पिके पाहून कमालीचे हताश झालेल्या राजेंद्र सपाटे यांनी आज पहाटेच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले सध्या शिक्षण घेत आहेत. घरातील कर्ता पुरुष आणि वडिलांचे छत्र हरवल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर आणि उदासीनतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

 Jalgaon Drought: जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
Bhandara News : दुष्काळात शेतकऱ्यांना भंडारा जिल्हा दुग्ध संघाचा 'मोठा आधार'; दुधाच्या दरात थेट लिटरमागं 4 रुपयांची वाढ, दूध संकलनातही मोठी आवक
दुष्काळात शेतकऱ्यांना भंडारा जिल्हा दुग्ध संघाचा 'मोठा आधार'; दुधाच्या दरात थेट लिटरमागं 4 रुपयांची वाढ, दूध संकलनातही मोठी आवक
Bhandara Leopard Attack : आई-वडिलांच्या डोळ्या देखत शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; पाच वर्षीय चिमुकल्याला अक्षरशः फरफटत नेलं, जागीच अंत; भंडाऱ्याचं दोनाड गाव हादरलं!
आई-वडिलांच्या डोळ्या देखत शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; पाच वर्षीय चिमुकल्याला अक्षरशः फरफटत नेलं, जागीच अंत; भंडाऱ्याचं दोनाड गाव हादरलं!
Arnab Cyclone: बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget