Bhandara Accident News: भीषण अपघात! भरधाव बोलोरो ट्रकवर आदळली; चौघांचा घटनास्थळीच मृत्यू; मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Bhandara Accident News: मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय.

Bhandara Accident News: मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय. हा भीषण अपघात(Accident) मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara News)शहराजवळील बेला इथं(27 एप्रिलच्या) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू, चालक गंभीर जखमी
पुढे आलेल्या माहिती नुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविलं. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.
अपघातातील मृतकांचे नावं
1) शिलेंद्र बघेल
2) शैलेश गोकुळपुरे
3) विनोद बिनेवार
4) अशोक धैरवाल
जखमी
1) अविनाश नागतोडे (चालक)
शेळ्या चराईसाठी घेऊन गेलेल्या महिलेचा वीज पडुन मृत्यू
शेतशिवारामध्ये शेळ्या चराईसाठी घेऊन गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील बिरसी येथे घडली आहे. मंगला बोरकर (42) असे मृतक महिलेचे नाव आहे. मृतक महिला ही सायंकाळच्या सुमारास शेतशिवारामध्ये शेळ्या चरायसाठी घेऊन गेली असताना अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यातच वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील नागरिकांनी प्रशासनाला याची सूचना दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यानं वीज जनित्रांमध्ये बिघाड निर्माण झाल्यानं भंडारा शहरासह ग्रामीण भागातील दोन तास वीज पुरवठा खंडीत झाल्यानं नागरिकांना अंधारात राहावं लागलं. अवकाळी पावसानं मुंबई - कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहरालगतच्या बायपास उड्डाण पुलावरील पावसाचं पाणी जाण्याचा मार्ग नसल्यानं साकोलीकडं जाणाऱ्या भिलेवाडा परिसरात उड्डाणपुलावर पावसाचं पाणी साचलं. इथून जाणारे खासदार प्रशांत पडोळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिथं थांबून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. पहिल्याचं अवकाळी पावसात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरील परिस्थिती दाखवणारा हा त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















