Bhandara Accident News: भंडाऱ्याच्या महामार्गावरील उड्डाणपुलावर होंडा सिटीनं दुचाकीस्वारांना चिरडलं;पती-पत्नीसह दोन चिमुकले गंभीर
Bhandara Accident News: भंडारा बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरून मोठी अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात दुचाकीवरील चौघांना पाठीमागून येणाऱ्या होंडा सिटी कारनं जबर धडक दिलीय.

Bhandara Accident News: भंडारा बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरून मोठी अपघाताची (Accident News) घटना घडली आहे. यात उड्डाणपुलावर जाणाऱ्या दुचाकीवरील एका कुटुंबातील चौघांना पाठीमागून येणाऱ्या आणि भरधाव वेगात आलेल्या होंडा सिटी कारनं जबर धडक दिलीय. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झालेय.ही घटना आज (21 जून) पहाटेच्या सुमारास घडली.
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना बायपास महामार्गावरील कोरंबी देवस्थानजवळ घडली. यात अपघातग्रस्त कुटुंब हे लाखनी येथून भंडाऱ्याच्या परसोडी या गावाकडं जात असताना हा अपघात घडला. यातील सर्व जखमींवर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. देविदास नांन्हे (वय 37), कविता नान्हे (वय 32), चेतना नान्हे (वय 8), दिव्यांश नान्हे ( वय 5) असं अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पूढील कारवाई सुरू केली असून या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अखेर 'त्या' वाघाला वनविभागाच्या रॅपिड रेस्क्यू टीमने केले जेरबंद
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या महामार्गावरील अंजोरा आणि साखरीटोला या दोन गावांच्या परिसरात नागरिकांना दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनास्थळी आमगाव वनविभागाच्या चमू दाखल झाल्यानंतर रॅपिड रेस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. गोंदिया वनविभागाचे रॅपिड रेस्क्यू टीमने घटनास्थळ गाठत त्या वाघाला जेरबंद केलं असून वाघाला नागपूर पाठविण्यात आले आहे. त्यानंतर त्या वाघाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. तर वाघ पकडला गेल्यामुळे परिसरातील नागरीकांनी सुटकेच्या श्वास घेतला आहे.
रेल्वे मार्गासाठी अवैध मुरूम उत्खनन; वनविभागाचाही मूक पाठिंबा?
गडचिरोली जिल्ह्यात वडसा रेल्वेस्थानक ते गडचिरोली शहरापर्यंत नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यासाठी खाजगी कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली असून या कंपन्या अनिर्बंध मुरूम व गौण खनिज उत्खनन करत आहेत. आरमोरी तालुक्यातील जंगलात व पोर्ला जंगलात कंपन्यांद्वारे मुरूम उत्खनन केले जात आहे. याला वनविभागाचा मूक पाठिंबा दिसत आहे. 29 मार्च 2025 रोजी गावकऱ्यांसमक्ष 33 हायवा आणि 3 पोकलेन वनविभागाने ताब्यात घेतल्याचे भासविले. मात्र प्रत्यक्षात कुठलीच कारवाई केली नाही. ग्रामस्थांनी या संदर्भात वन विभागाला स्मरणपत्रे दिली. मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ता कृष्णा वाघाडे यांनी वनसंरक्षक कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी व वनरक्षकांना चौकशी करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणी सह जिल्ह्यातील मारखंडा, पेड्डीगुडम व जिम्मलगट्टा वन परीक्षेत्रात अवैद्य मुरूम उत्खनन व झाडांची कटाई झाली असून या क्षेत्रातील वनअधिकारी, कर्मचारी यांना निलंबित करून कारवाई करण्याची मागामी उपोषणकर्ता यांनी केली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या





















