Bhandara Accident News: भंडारा शहरातून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना घडल्या असून यात पहिल्या घटनेत तिघांचा तर दुसऱ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत दुचाकीवरून नागपूरकडून भंडाऱ्याकडं येत असलेल्या तिघांचा अज्ञात वाहनासोबत झालेल्या भीषण धडकेत (Accident News) तिघांचा मृत्यू झालाय. भंडारा (Bhandara) शहरालगत असलेल्या टाकळी खमाटा येथील हे तिघेही एकाचं दुचाकीवरून मध्यरात्री भंडाऱ्याकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, अन्य गंभीर एका तरुणाचा उपचारादरम्यान नागपुरात मृत्यू झाला. 

पुढे आलेल्या  माहितीनुसार, भंडाऱ्याच्या मौदाजवळ हा अपघात झाला आहे.  आदित्य भुरे ( वय 19 वर्ष), सिमोल भुरे (वय 22 वर्ष) आणि किरण केवट (वय 23 वर्ष) असं अपघातात मृत पावलेल्यांची नाव आहेत. तर ते एकाचं गावातील रहिवासी असून  तिघांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे.

कार चालकानं दुचाकीस्वार दोघांनाही बेदरकारपणे चिरडलं

दरम्यान, दुसऱ्या अपघाताच्या घटनेत डस्टर कार चालकानं दुचाकीस्वार दोघांना चिरडलं आहे. राष्ट्रीय महामार्गावरील साकोलीच्या उकारा फाट्यावर ही घटना घडली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, ऑटोतील प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गालागत उतरविल्यानंतर चालकानं ऑटो महामार्गावर वळविला. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांची ऑटोला जबर धडक बसली आणि दोघेही महामार्गावर कोसळले. याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या डस्टर कार चालकांनं महामार्गावर कोसळलेल्या दुचाकीस्वार दोघांनाही बेदरकारपणे चिरडलं. ही भीषण आणि विचित्र दुर्घटना नागपूर-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या उकारा फाट्यावर घडली.

ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मृतक दोघेही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील असून ते नागपूरला रोजगाराच्या शोधात निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली. यादवराव वघारे (वय 36) आणि जितेंद्र उपराडे (वय 28) असं मृतकांचं नावं आहे. याप्रकरणी साकोली पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भंडाऱ्याच्या सिहोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी केली अटक

प्रेमाच्या जाळ्यात ओढून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करून पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिसांनी आरोपी तरुण मंगेश रहांगडाले (25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या