Hingoli: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला पाच महिने उलटून गेल्यानंतर या प्रकरणात बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी 5-10 कोटींपासून 50 कोटींचा ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केल्याने मोठी खळबळ उडाली असताना आता त्यांनी एन्काऊंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवली असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनासुद्धा मी या ऑफरविषयी माहिती दिली होती. त्यावर तुम्हाला वाटेल तो निर्णय घ्या. या एन्काऊंटरनंतर  तुमची लाईफ बदलून जाईल असं पांडकर म्हणाले असल्याचा दावा आता निलंबीत अधिकारी रणजीत कासले यांनी केलाय. या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा आहे. (Walmik Karad encounter Offer)

एन्काऊंटरच्या ऑफरची डायरीत नोंद

संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबीत अधिकारी रणजीत कसले यांनी वाल्मीक कराड यांचा एन्काऊंटर करण्याची ऑफर देण्यात आली होती असा दावा केलाय. ते म्हणाले, 'तुमचा जवळ पगार होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने 50 करोड किंवा 25 करोड जेवढी रक्कम मागणी करत तेवढी मान्य करून एन्काऊंटर साठी ते रक्कम दिली जाते अशी ऑफर मला दिली गेली होती .ऑफर दिल्यानंतर त्या ऑफरची माहिती मी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार एडिशनल एस .पी. सचिन पांडकर यांना सुद्धा या संदर्भात माहिती दिली होती. त्यांनी तेव्हा एडिशनल पांढरकर यांनी तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या. या एन्काऊंटर नंतर तुमची लाईफ बदलून जाईल असं ॲडिशनल एस पी बोलले होते. असा दावा रणजीत कासलेंनी केलाय. अंजली दमानिया एकदम बोगस आहे. तिला 24 तास फक्त मीडिया वरती दिसली पाहिजे असं वाटतंय .अंजली दमानिया जनतेची दिशाभूल करतात  असा आरोपही त्यांनी केलाय.

कोण आहेत रणजीत कासले?

रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन अनेक खळबळजनक दावे केले होते. मात्र, आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले(Ranjeet Kasle) यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.