Suresh Dhas: खोक्या उर्फ सतीश भोसले च्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृत घर बांधण्यात आल्याचा समोर आलं .आता सतीश भोसलेचे घर पाडण्यासाठी अतिघाई का केली ? असा जाब भाजप आमदार सुरेश धस वनविभागाला आणि कलेक्टर यांना विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं .खोक्या उर्फ सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे .सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावातील घरावर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर अनेकांकडून ती जमीन वन विभागाची असल्याचं म्हटलं तर काहींचं म्हणणं आहे ते जमीन वाटप करण्यात आली आहे .या घटनेत संपूर्ण माहिती घेऊन याबाबत कलेक्टर आणि वनविभागाला विचारणा करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं . (Suresh Dhas)
काय म्हणाले सुरेश धस?
सतीश भोसले याचे घर पाडण्यासाठी अति घाई केल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत. तसेच मला देखील प्रश्न पडला आहे. की कृष्णा आंधळे कसा आता होत नाही. मात्र तो लवकरात लवकर अटक व्हावा.. अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. तर सतीश भोसले प्रकरणाची मी माहिती घेत असून काही जणांचे म्हणणे सतीश भोसलेची जमीन वनविभागाची तर काहींचं म्हणणं ती जमीन वाटप करण्यात आली आहे. मात्र उद्या मी त्या ठिकाणी जाणार असून माहिती घेईल.. सतीश भोसले याचे घर पाडण्यासाठी अति जास्त घाई केली. अस म्हणत याबाबत कलेक्टर आणि वनविभागाला विचारणा करणार असल्याचे धस यांनी म्हटले आहे..
सुरेश धसांच्या आमसभेत मारेकऱ्यांना कठोर शासनाचा ठराव मंजूर
आष्टी मध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेतून सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावे याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय. बीडच्या आष्टी मतदार संघात सात वर्षानंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्या संकल्पनेतून आम सभेचे आयोजन करण्यात आलं. या सभेदरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावे असा ठराव घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरपंच परिषदे मुंबई प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांची या आम सभेमध्ये उपस्थिती होती. यावेळी आमदार सुरेश धस यांच्यासह नागरिकांनी एक मताने हा ठराव मंजूर केला आहे. याबरोबरच आष्टी मतदारसंघातील विविध प्रलंबित कामासंदर्भात या आम सभेमध्ये नागरिकांच्या समस्या अधिकारी आणि आमदारांनी ऐकून घेत विषय मार्गी लावले.