Santosh Deshmukh murder case :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) जिवंत आहे की नाही हा मला डाऊट आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत. पण तो सापडत नाही, त्यामुळं त्याचा खून झाला असावा अशी शंका असल्याचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat)  यांनी केलं आहे. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही,  त्यामुळं कारवाई करणं योग्य नाही असे शिरसाट म्हणाले. तपासात थोडे जरी आढळून आले तर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले.  

Continues below advertisement

धारावीच्या लोकांना आम्ही चांगले जीवनमान देणार

संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. राहुल गांधी यांना बॉडी बिल्डिंग, भारत जोडो पासून सुटका मिळाली आहे. ते इव्हेंट म्हणून धारावीच्या लोकांकडे बघत आहेत. पण आम्ही त्यांना चांगले जीवनमान दिल्याशिवाय राहणार नाही, असे शिरसाट म्हणाले. 

आम्ही छावा सारखे लढलो

उद्धव ठाकरेंनी स्वत: छावा बघायला पाहिजे असे संजय शिरसाट म्हणाले. शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. त्यांना आता माघार घेता येत नाही, आम्ही छावा सारखे लढल्याचे शिरसाट म्हणाले. अदिती तटकरे यांनी बोलावले म्हणून आम्ही गेलो असे नाही, अनेकांनी छावा चित्रपट बघितला आहे त्यामुळे कोणी चित्रपट बघण्यासाठी गेले नाही

Continues below advertisement

अबू आझमीला झेंडू बामचा तडका देणार

दरम्याव, यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर देखील जोरदार टीका केली. अबू आझमीला झेंडू बामचा तडका देणार असल्याचे शिरसाट म्हणाले. ओवेसी असेल किंवा अबू आझमी हे विष कालवण्याचे काम करत असल्याचा हल्लाबोल संजय शिरसाटांनी केला. 

कोलांटी उडी मारण्याचा नाना पाटोले यांचा छंद

आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणी बेताल बोलत असेल तर त्याला लोकशाही पद्धतीने काय शिक्षा होवू शकते हे आम्ही दाखवून देऊ, मग तो कोणीही असो असे संजय शिरसाट म्हणाले. यावेळी शिरसाट यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली. कोलांटी उडी मारण्याचा नाना पाटोले यांचा छंद आहे. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असतात. हा देश ही मुंबई सर्वांची आहे. आपल्या राज्यातील लोक देखील अनेक ठिकाणी जातात. प्रत्येक राज्यातील प्रत्येक माणसाला कुठेही राहण्याचा अधिकार आहे. फक्त त्या ठिकाणची संस्कृती आणि भाषेचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्रात राहणार हा आमचा, देशात राहणार हिंदू आमचा ही आमची भूमिका आहे. मराठीचा द्वेष करण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना प्रतिउत्तर देऊ ही आमची भूमिका असल्याचे शिरसाट म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Jitendra Awhad: 'कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली...', जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर...