Police Recruitment Beed News: बीडमध्ये बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर, MBA, MCA झालेले उच्चशिक्षित तरुण पोलीस भरतीसाठी मैदानात उतरले
Police Recruitment Beed News: केवळ बारावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी या उमेदवारांची रांग लागल्याने बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे.

बीड : बीड पोलीस दलात 174 जागांसाठी 8134 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या मध्ये इंजिनियर्स, एमबीए, बीएससी, बीकॉम, एमएससी, एमबीए आणि पदवीधारक (Police Recruitment Beed News) आहेत. केवळ बारावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी या उमेदवारांची रांग लागल्याने बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. (Police Recruitment Beed News)
अर्जाची छाननी केल्यानंतर 2653 अर्जदार पदवीधर असल्याचं समोर आलं
बीड जिल्हा पोलीस दलातील 174 जागांसाठी यावेळी आठ हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. या भरती प्रक्रियेत अर्जाची छाननी केल्यानंतर 2653 अर्जदार पदवीधर असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये कला शाखेचे सर्वाधिक 1428, विज्ञान शाखेचे 582 आणि वाणिज्य शाखेच्या 321 उमेदवारांचा सहभाग आहे. तर इंजीनियरिंग क्षेत्रातील 47 उमेदवार आणि औषधनिर्माण क्षेत्रातील 19 उमेदवार पोलीस भरतीच्या प्रक्रियेत आहेत. (Police Recruitment Beed News)
कॉर्पोरेट क्षेत्रातील 19 एमबीए पदवीधर
केवळ पदवी नाही तर उच्च शिक्षणाची सर्वोच्च पदवी घेतलेले 388 पदव्युत्तर उमेदवार ही यात मागे नाही. 195 एम.ए, 59 एम.कॉम आणि 56 एम.एससी पूर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील 19 एमबीए पदवीधर ही पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू होण्यासाठी सज्ज आहेत. उच्च शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने पोलिस भरती प्रक्रियेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं या उमेदवारांनी सांगितले.(Police Recruitment Beed News)
दरम्यान ही पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक (Police Recruitment Beed News) होण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा प्रयत्न दिसून येतो आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर या भरतीत केला जातो आहे. तसेच उत्तेजित पदार्थाचे सेवन करून मैदानात उतरणाऱ्या उमेदवाराला तंबी देण्यात आली. त्याबरोबरच पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे अमिष देणाऱ्या एजंट पासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. (Police Recruitment Beed News)
परभणी जिल्हा पोलिस दलाच्या 97 जागांसाठी तब्बल 10679 अर्ज
परभणी जिल्हा पोलीस दलातील केवळ 97 जागांसाठी तब्बल दहा हजार 679 अर्ज आले आहे आजपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.जवळपास महिना भर ही प्रक्रिया सुरू असणार आहे.८५ सीसीटीव्ही,आर एफ आर डी तंत्रज्ञान वापरून ही प्रक्रिया सुरू आहे बिड मद्ये घडलेल्या घटनेनंतर दोन वैद्यकीय पथक परभणीत या भरती प्रक्रियेत तैनात करण्यात आले आहे. रोज 1000 उमेदवारांचे नियोजन करण्यात आले आहे. बीड मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर 2 वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
























