बीड : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. त्यावर आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली. एका बहिणीचा जीव गेला आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे. पण ती कुणाच्या तरी पीएची पत्नी होती म्हणून मी राजकारण करणार नाही असं बजरंग सोनवणे म्हणाले.
पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता. या प्रकरणी वरळी पोलिसानी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. गौरी पालवे या केईएम रुग्णालय डेंटिस विभागात कार्यरत होत्या.
Gauri Palwe Death Case : बजरंग सोनवणे काय म्हणाले?
या विषयावर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, "हा विषय समजून घेऊन त्याच्यावर बोलले पाहिजे. माझ्या एका भगिनीचा जीव गेलेला आहे, तिच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. तिला न्याय मिळाला पाहिजे. तिने आत्महत्या का केली याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय त्याच्यावर बोलणे संयुक्तिक असणार नाही. कुणाच्या तरी पीएच्या पत्नीने आत्महत्या केली म्हणून त्यावर राजकारण करणारा मी नाही."
दरम्यान, गौरी पालवे यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Pankaja Munde PA Anant Garje Wife Suicide : गौरीच्या वडिलांचे आरोप काय?
अनंतचे वारंवार गौरीसोबत किरकोळ कारणांवरून वाद व्हायचे.
लग्नानंतर लगेचच किरण इंगळेसोबत अनंतचं अफेअर असल्याचं गौरीला कळालं.
पतीच्या अफेअरबद्दल गौरीने नणंद शीतल आंधळेला सांगितलं असता, नणंदेने भाऊ अनंतचं दुसरं लग्न लावण्याची धमकी दिली.
बीडीडीतील घरातून सामान शिफ्ट करताना गौरीला गर्भपाताची कागदपत्रं सापडली.
2021 मधील गर्भपाताच्या कागदपत्रांवर पती म्हणून अनंत गर्जेचा उल्लेख.
3 जानेवारी 2025 - मुंबईतल्या घरी आलेल्या गौरीच्या आई-वडिलांना तिच्या मानेवर, चेहऱ्यावर जखमांचे व्रण दिसले.
22 नोव्हेंबर 2025 - अनंतने गौरीच्या वडिलांना फोन करून, गौरी आत्महत्या करत असल्याचं सांगितलं.
अनंतने गौरीकडे फोन देण्यास नकार देत, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचं सांगितलं.
अनंतने सासूला फोन करून गौरीचा मृतदेह समोर असल्याचं सांगून फोन ठेवला.
पुन्हा अनंतला कॉल केले असता त्याने फोन उचलला नाही.
ही बातमी वाचा: