Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग येथील सरपंचाचा खून (Santosh Deshmukh Murder Case) आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनांविषयी आ. पंकजा मुंडेंनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी
मस्साजोग ता. केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याचप्रमाणे परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचं काल रात्री काही लोकांनी अपहरण करून लूटमार केली याबाबत माहिती प्राप्त झाली. या दोन्ही घटनांबरोबरच जिल्ह्यात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी करून आ. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत याबद्दल संताप व्यक्त केला आहे . याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको करत असलेल्या ग्रामस्थांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांच्या तडकाफडकी निलंबन केलं आहे.. केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर देशमुख खून प्रकरणातील ठिय्या आंदोलन मागे
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मसाजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून सकाळपासून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले.
आंदोलन चिघळू नये म्हणून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी पाच तास आंदोलकांमध्ये सहभाग घेऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आंदोलन स्थळी दाखल झाले. आणि पाच तासानंतर पोलीस प्रशासन आणि जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ठिय्या मागे घेऊन देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या