बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले असून आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर ही निवडणूक झाली असून यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेले होते. आज झालेल्या मतदानात गावातील  2 हजार 84 मतदारांपैकी 1 हजार 744 मतदारांनी आपला हक्क बजावला. आता समोर आलेल्या निकालानुसार संतोष देशमुखांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोग  ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला आहे. 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. (Massajog Election Result) 

Continues below advertisement

बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया 28 एप्रिलला पार पडली. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले होते. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर ही निवडणूक होत असून यामध्ये आश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केले होते. काल झालेल्या मतदानात गावातील  2 हजार 84 मतदारांपैकी 1 हजार 744 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांच्या फरकाने पराभव केला.

Massajog Election Result : विजयानंतर काय म्हणाले स्वरुपानंद देशमुख?

विजयानंतर बोलताना स्वरुपानंद देशमुख म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझे मतदार माझ्यासोबत आहेत. त्यांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन हे सिद्ध केले आहे. कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्यासोबत आहे. मी अगोदरही संतोष देशमुखांसाठीच्या न्यायासाठीच्या लढाईत पुढे होतो, इथून पुढेही या लढाईत मी असेन. हा विजय माझ्या तरुण मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, हा माझ्या गावातील जनतेचा आणि स्वाभिमानी मतदारांचा विजय आहे. आगामी काळात गावातील आपली कामं कोण करु शकतो, हे जनतेने लक्षात घेतलं आणि मला मतदान केले, अशी प्रतिक्रिया स्वरुपानंद देशमुख यांनी व्यक्त केली.

Continues below advertisement

Massajog Election Result : मसाजोग सरपंच पोटनिवडणूक निकाल

पहिल्या फेरीत स्वरूपानंद देशमुख 156 मतांनी आघाडीवर 

स्वरूपानंद देशमुख - 375अश्विनी देशमुख -219

दुसऱ्या फेरीत स्वरूपानंद देशमुख 20 मतांनी आघाडीवर 

स्वरूपानंद देशमुख - 207अश्विनी देशमुख - 343

तिसऱ्या फेरीअंती स्वरूपानंद देशमुख विजयी 

स्वरूपानंद देशमुख - 332अश्विनी देशमुख - 260

एकूण मतदान - 1744स्वरूपानंद देशमुख - 914अश्विनी देशमुख - 822नोटा - 8स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी