Beed: जातीच्या नावावर राजकारण करता पण ज्ञानेश्वरी मुंडेंना का भेटला नाहीत असा सवाल करुणा शर्मा यांनी मुंडे बंधु भगिनींना विचारलाय. बीडमध्ये महादेव मुंडे खून प्रकरणात नवे खुलासे होत असताना करुणा शर्मांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीची ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील येथे भेटायला यायला पाहिजे, तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्ही त्यांना भेट द्यायला येत नाहीत असं त्या म्हणाल्या.
संतोष देशमुख प्रकरण, वाल्मीक कराडशी असणारी निकटचे संबंध यावरून विरोधकांकडून होणारी राजीनामाची मागणी, हत्या प्रकरणाचे फोटो येतात मंत्रिपदाचा द्यावा लागणारा राजीनामा यावरून 200 दिवसांनी वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात धनंजय मुंडे बोलले . यानंतर आता करुणा शर्मांनी महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेत नंतर माध्यमांशी संवाद साधला . 'समाजाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मोठ्या गप्पा मारत आहात .तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्हाला त्यांना भेट द्यायला येता येत नाही ' असे म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली .
काय म्हणाल्या करुणा शर्मा?
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या लढ्यात त्यांना मनोबल देण्यासाठी मी इथे आले आहे .पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील येथे भेटायला यायला पाहिजे, तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्ही त्यांना भेट द्यायला येत नाहीत .समाजाच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही मोठ्या गप्पा मारत आहात .मी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाच्या आंदोलनात येणार होते पण तब्येत बरी नसल्यामुळे आले नाही .आज तुम्ही लढत रहा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत .कोणीही महिलेचं कुंकू पुसण्याचे हिंमत करणार नाही . असं करुणा शर्मा म्हणाल्या . 'अजित पवार तुम्हाला धनंजय मुंडे यांचे दुःख दिसते पण महादेव मुंडे परिवाराच्या दुःख दिसत नाही .आज ज्ञानेश्वरी मुंडे मी आणि सारंगी महाजन असे आम्ही सगळे लोक अन्यायाविरुद्ध लढत आहोत "असेही करुणा शर्मा म्हणाल्या .
धनंजय मुंंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका...
कृषी विभागाच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांना न्यायालयानं क्लिनचिट दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. कराड प्रकरणातून मुंडेंना क्लिनचीट मिळाल्यानंतर त्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यावरती आता करूणा शर्मा यांनी संताप व्यक्त केला होता. आजही उपमुख्यमंत्री अजित पवारांना धनंजय मुंडेंचे दु:ख दिसते पण महादेव मुंडेंचे दु:ख दिसत नाही असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा: