बीड : राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील करुणा शर्मांची (Karuna Sharma) याचिका परळी न्यायालयाने फेटाळली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी तक्रार केली होती. परळी प्रथम वर्ग न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळ धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Continues below advertisement

लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने  करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. 

Karuna Sharma News : करूणा शर्मांची न्यायालयात याचिका

विधानसभा निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या नावाचा उल्लेख टाळल्या प्रकरणी शर्मा यांनी ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर करुणा शर्मा मुंडे यांची तक्रार परळी न्यायालयाने फेटाळली आहे.

Continues below advertisement

याआधी देखील कृषी विभागाच्या खरेदीत धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला होता असा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने तक्रारदाराला दंड लावला होता.

Karuna Sharma Vs Dhananjay Munde : करुणा शर्मा यांचे मुंडेंवर आरोप

करुणा शर्मा या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांनी या आधीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी आपला मानसिक छळ केला असं करुणा शर्मा यांनी म्हटलं होतं. तसेच करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडवरही आरोप केला होता. 

मुंडे अमित शाहांच्या दारी? 

काही दिवसांपूर्वी आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आलं. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. 

ही बातमी वाचा: