R T Deshmukh Accident: आर टी देशमुखांच्या गाडीचा अपघात कसा झाला? बेलकुंडजवळच्या रस्त्यावर 'त्या' गोष्टीने घात केला
Beed R T Deshmukh death: बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला होता. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

Beed News R T Deshmukh accident death: माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा सोमवारी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते सोलापूरवरुन ते लातूरकडे निघाले होते. त्यांचा अंगरक्षक आणि वाहनचालक याच्याबरोबर ते सोलापूरहून लातूरकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड याठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावर वेगात असलेल्या त्यांचे वाहन चार पलटी खाऊन सर्व्हिस रोडवर येऊन पडले.
उड्डाणपुलावरील उतारावर गाडी निघाली असता पावसाचे पाणी उतारावर वाहत होते. हे पाणी गाडीच्या समोरील काचेवर आल्याने वाहन चालकाला अंदाज आला नाही. ब्रेक लावण्याच्या घाईत आर.टी. देशमुखांची गाडी फ्लायओव्हरवरील पाच लोखंडी कठडे तोडत सर्व्हिस रोडच्या बाजूला येऊन पडली. त्यांची कार अत्यंत वेगात असल्याने कारने चार पलट्या खाल्ल्या होत्या. गाडी अक्षरशः चक्काचूर झाली होती. बाजूलाच बेलकुंड पोलिसांचा आऊट पोस्ट आहे. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क केला. गाडीतील जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारासाठी लातूरकडे घेऊन निघाला असतानाच वाटेतच माजी आमदार आर टी देशमुख यांचा मृत्यू झाला. (Car Accident News)
या रस्त्यावर बेलकुंड परिसरात उड्डाण पुलावरील उतरणीला पाणी जमा होते. हे पाणी वेगात असलेल्या वाहनाच्या काचेवर येते. वाहन चालकाचा अंदाज चुकतो. त्यामुळे ब्रेक लावण्याच्या घाईत अनेक वाहने पलटी होतात. यापूर्वी याठिकाणी अशाप्रकारे तीन वाहनं पलटी झाली आहेत. मात्र किरकोळ जखमा आणि गाडीचं नुकसान यापलीकडे काही झालं नाही. मात्र, आर. टी. देशमुख यांच्या वाहनाचा अपघात झाला त्यांचा मृत्यूही झाला.
Beed News: आर.टी. देशमुखांच्या निधनाने बीड जिल्ह्यात शोकाकुल वातावरण
आरटी देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर आमदार बनले होते. ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्यात परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. देशमुखांच्या निधनाचे वृत्त कळताच मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन लातूर गाठले. तसेच देशमुख कुटुंबीयांशी फोनवरुन संवादही साधला.
आणखी वाचा
मोठी बातमी! माजी आमदार आर.टी. देशमुख यांचं कार अपघातात निधन; पंकजा मुंडेंचे सगळे कार्यक्रम रद्द





















