बीड : हैदराबाद गॅझेटमध्ये (Hyderabad Gazette) वेगवेगळ्या जाती आहेत, त्यामुळे सरकारनं बंजारा समाजाला (Banjara Samaj Morcha) संविधानाच्या चौकटीतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. जोपर्यंत बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण (ST Reservation Maharashtra) मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, मी नेहमी पाठीशी उभा असेन असं वक्तव्यही मुंडे यांनी केलं. बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे यासाठी बीडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.
हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून करुन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं. हा बंजारा समाज तेलंगणात, राजस्थानात आणि देशभरात अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल, तसा प्रयत्न मी करणार. हा माझा वैयक्तिक लढा आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.
बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का?
हैदराबाद गॅझेटमध्ये वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे. त्यानुसार आता आधीचे एसटी आणि नव्याने येऊ घातलेले एसटी यांचा मेळ घालावा, त्याचा अभ्यास करावा. त्यानुसार संविधानाच्या चौकटीत बसवून आरक्षण द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही समाज एकच आहेत असंही धनंजय मुंडे म्हणाले.
बंजारा आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू
माझ्या सारखा नशिबवान मीच आहे. मी आज मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं. मंत्री नाही म्हणून येता आलं. आज महाराष्ट्रातल्या मराठा, धनगर आणि इतर वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासोबत आता बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतही मला उभा राहता येतं, त्यामुळे मी नशिबवान आहे. प्रत्येक मोर्चामध्ये मी तुमच्यासोबत आहे. बंजारा समाजाला जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही.
बंजारांना एसटीमधून आरक्षणाची मागणी
बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी मागणी करत बीडमध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव एकवटले. बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. बंजारा समाजातील तरुणींनी आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधत भाषणे केली.
बंजारा आरक्षणाच्या मागणीला जिल्ह्यातील सहा आमदार आणि एका खासदाराने पाठिंबा दिला आहे. तर बीडमध्ये समारोप होत असलेल्या बंजारा समाजाच्या मोर्चात पारंपरिक पोशाख परिधान करून आमदार विजयसिंह पंडित सहभागी झाल्याचं दिसून आलं.