Beed :बीड जिल्ह्यातील केज (Kej ) तालुक्यातील विडा येथे अवादा कंपनीच्या कॉपर वायरची (copper wire) चोरी झाल्याची घटना घडली आहे. सुमारे 12 लाख रुपये किंमत असलेल्या कॉपर वायरची चोरी झाली आहे. वॉचमनला बांधून ही कॉपर वायरची चोरी करण्यात आली आहे. अभिजीत दुनघव, आकाश जाधव या दोन्ही कर्मचाऱ्यांना अज्ञातांकडून बांधून चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी 14 अज्ञाताविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन सुरक्षा रक्षकांना बांधून 12 लाख रुपये साहित्याची चोरी
दोन सुरक्षा रक्षकांना बांधून आवादा पवन चक्कीचे 12 लाख रुपये साहित्याची चोरी केली आहे. याप्रकरणी 14 अज्ञात चोरट्यां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाला बांधून पवन चक्कीचे सुमारे 12 लाख रु. किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे. आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुरु आहे. दिनांक 8 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
विडा येथे पवन चक्की उभारणीच्या कामावर काम करीत असलेले सुरक्षा रक्षक झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना त्यांच्या चादर फाडून त्यानेच त्यांचे हातपाय बांधले. पवन चक्कीचे केबल व इत्तर साहित्य चोरुन नेले आहे. याबाबतची माहिती सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांनी साहित्य चोरीची माहिती आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी आकाश जाधव याच्या तक्रारी नुसार 14 अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.