बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) प्रकती बिघडली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी सुरू असून तपासणीनंतरच त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून (Doctor) निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, यापूर्वी अनेकवेळ वाल्मिकचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 

Continues below advertisement

आरोपी वाल्मीक कराडला अस्वस्थ वाटू लागल्याने आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून आरोपी वाल्मीक कराडच्या चाचण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. यावेळी, रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात होता. तर, वाल्मिक कराडचे कार्यकर्तेही रुग्णालयाबाहेर गर्दी करुन  उभे होते. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याच्यावरील सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयातही जामीन फेटाळला

दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ पूर्ण होत आला असून सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकसह 5 जण अटकेत असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. वाल्मिक कराडची तरुंगाबाहेर येण्यासाठी धडपड सुरू असून दिल्लीत, सर्वाच्चा न्यायालयात देखील वाल्मिक कराडचा जामीन फेटाळण्यात आला आहे. वाल्मिकने सातत्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, आधी सत्र न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील वाल्मिकचा जामीन फेटाळला. त्यानंतर, वाल्मिकच्या मुलानेही फेसबुक पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं होतं.  

Continues below advertisement

हेही वाचा

प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!