एक्स्प्लोर

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?

आता डीआयजींच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून यानंतर कारागृहातील आणखी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

Beed: बीडमध्ये विकास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. वाल्मिक कराड तुरुंगातून माझ्या मुलाला अडकवण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत केला. एवढेच नाही तर एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या आरोपानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड कारागृहाची तब्बल सात तास झडती घेतली आहे.

विशेष बाब म्हणजे, डीआयजी योगेश देसाई यांनी चौकशी करताना कारागृहातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवल्याची माहिती आहे. बीड जिल्हा कारागृह जवळपास वर्षभरापासून चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी या कारागृहात बंदिस्त आहेत. त्यामुळे हे कारागृह अतिसंवेदनशील आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यापूर्वी कारागृहातील कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार केली होती. 

बीड जिल्हा कारागृहाची सात तास झडती, कसून चौकशी 

विलास घुले खून प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा कट वाल्मिक कराड याने कारागृहातून रचल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत केला.इतकंच नाहीतर एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवल्यानंतर खळबळ उडाली. या सर्व प्रकारानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उप महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड कारागृहाची सात तास झडती घेतलीय. विशेष बाब म्हणजे, डीआयजी योगेश देसाई यांनी चौकशी करताना कारागृहातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवल्याची माहिती आहे. त्यांनी ही स्वतः बराकमध्ये जात कैद्यांची चौकशी केली. कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट तसेच फोन कॉलच्या आरोपाबाबत त्यांनी स्वतःच कायद्याकडून माहिती घेतलीय. दरम्यान या आधीच कारागृहातील गैरप्रकार बाबत दोन कर्मचाऱ्यांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. आता डीआयजींच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून यानंतर कारागृहातील आणखी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

बजरंग सोनवणे नेमकं काय म्हणाले होते?

गुरुवारी (1 ऑक्टोबर 2026) खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत 'वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन गेला. माझ्या मुलाला अडकवण्यासाठी कट रचला, खासदार बजरंग सोनवण्याच्या पोराला विलास घुलेख खून प्रकरणात अडकवा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढा, तुला भगवान बाबाची शपथ पण त्या गाबड्याला अडकवा असं वाल्मिक कराड बोलत आहे, समोरचा व्यक्ती, अण्णाजी अण्णाजी म्हणत होता. वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराडची जेलमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचेही बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

संबंधित वृत्त: सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांत गुन्हा, नेमकं कारण काय?
धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांत गुन्हा, नेमकं कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget