बीड : बीड पोलीस (Beed Police) दलातील आणखी एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आलं आहे. तपासाकरता परराज्यात गेले असताना पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला होता. निलंबनाचा आदेश येताच पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांवर निलंबित पोलीस अधिकाऱ्याने आरोप केले आहेत. रणजीत कासले असे निलंबीत करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
अधिकाऱ्याने परराज्यात तडजोड करत पैसे घेतल्याचे व्हिडीओ समोर
बीड पोलीस दलात आता एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने परराज्यात तपासाकरिता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणाची चौकशी करत कासले यांच्या निलंबनाचे आदेश नवनीत कावत यांनी काढले आहेत. दरम्यान निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल करत पोलीस अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप करून या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
तृप्ती देसाई यांनी देखील केले होते पोलिसांवर आरोप
बीड जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 20 कर्मचाऱ्यांची वाल्मिक कराडशी (Walmik Karad) जवळीक होती, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी तक्रार केली होती. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराडचा सहभाग आढळला आहे. त्यानंतर कराडसोबत अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 26 जणांच्या नावासह यादी आणि तक्रार दिली होती. त्याप्रमाणे बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची नियुक्ती केली. त्यांनी अगोदर आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले होते. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्ष काम करतात. अनेक गुन्हेगारांना त्यांनी पाठीशी घातले आहे. माझ्याकडे या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अनेक पुरावे ऑडिओ, व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. हे सर्व पुरावे घेऊन मी बीडला जाणार असल्याची माहिती देखील तृप्ती देसाई यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या:
